आयुष्य सुंदर आहे

आजकाल धावपळीच्या जीवनात आपले आयुष्य किती सुंदर आहे याकडे आपले लक्षच नसते. दररोज दिसणारी गोष्ट म्हणून आपण बऱ्याच गोष्टी बघून न बघितल्यासारख्या करतो जे आपल्याला जवळ असते त्याची किंमत आपल्याला कधीच कळत नाही….. आणि जी वस्तूची/माणसाची  आपल्याला रोजच्या जीवनात सवय होते तेच जेव्हा आपल्यापासून दूर जाते, तेव्हा आपल्याला त्याची किंमत कळते.
जसे कि, आई वडिलांशी आपण रोज बोलतो, कधी वादविवाद होतात, आपण हक्काने किती हट्ट करतो आणि ते आपले सगळे हट्ट पूर्ण करतात… याचा आपण कधी साधा विचार करतो का? कि आज पर्यंत आई पप्पांनी आपल्यासाठी काय काय केले.. नक्कीच नाही. पण आई वडिलांची खरी काय किंमत असते आपल्या आयुष्यात हे एका नुकतेच लग्न होऊन, सासरी राहायला गेलेल्या मुलीला विचारा… तिने जर तुम्हाला सांगायला सुरुवात केली तर मला नाही वाटत कि १-२ दिवसात तुमचे आणि तिचे बोलणे पूर्ण होईल. आई आपल्यासाठी रोज जेवण बनवते… हि किती साधी गोष्ट आहे ना… पण ती पण एक माणूस आहे, तिला पण कधी कंटाळा येतो असे बोलले तर नवरा बोलतो कि तिला कधी कंटाळा आला तर मी तिला हॉटेल मध्ये घेऊन जातो, हॉटेल मध्ये जरी नेले, तरी जेवायला जात असाल. नाष्टा तीच बनवते ना सकाळी..? घरातली साफसफाई कशी होते त्या दिवशी? तुम्ही जर कामाला जात असाल तर असं विचार करा, कि आठवड्यामध्ये तुम्हाला एकच दिवस सुट्टी आहे रविवारी पण ती पण अर्धा दिवस तर तुम्हाला कसे वाटेल? तुम्हाला वाटेल का कि आपल्याला सुट्टी मिळाली म्हणून, तसाच विचार करा कि आईला तिच्या आयुष्यामध्ये कधी आपण पूर्ण दिवस सुट्टी देतो का? कधी तिला बोलतो का कि आज तू आराम कर पूर्ण दिवस, काही काम करू नकोस… म्हणून जमले तर तिला वर्षातून एकदातरी ४-५ दिवसांच्या टूर वर घेऊन जात जा….
नेहेमी आई वडिलांचा विषय निघाला कि सगळे जण आईवरच खूप बोलतात, पण बाबांकडे कोणाचे लक्ष कधीच जात नाही, जे आपल्या वाढदिवसाला न विसरता केक घेऊन येतात, आंब्याचा महिना सुरु झाले कि मुलाला आंबे खूप आवडतात म्हणून आंबे आणतात, आपल्या शाळा, कॉलेजची फी अगदी न विसरता भरतात, त्यांच्या मुळेच आपण एवढे शिकू शकलो हा कधी विचार केलात तुम्ही? नवीन टीव्ही साठी हट्ट केलात, नवीन कॉम्पुटरसाठी हट्ट केलात तर, नवीन मोबाईल, नवीन ड्रेस कशा साठी पण एकदा बाबांना सांगितले तर जमले तर त्याच आठवड्यात, किंवा जितक्या लवकर जमेल तितक्या लवकर, (परिस्थितीनुसार) ते आपला हट्ट पूर्ण करण्याचा प्रयत्न करतात. त्यांना पण आपल्या घरासाठी वेळ देण्याची इच्छा असते, पण त्यांनी घराला वेळ दिला तर आपल्या गरजा कोण पूर्ण करणार? आपण नेहेमी खुश राहावे, आपल्याला उद्या चार-चौघात गेल्यावर कमीपणा किंवा लाज वाटू नये म्हणून नवीन चालीरीती मान्य करून (स्वतःच्या हौशी कमी करून आणि स्वतःच्या पोटाला चिमटा काढून) ते आपले सगळे हट्ट पूर्ण करतात. पण जेव्हा ते रिटायर होतात तेव्हा त्यांना खरी आपली गरज असते.. हे कधीच विसरू नका… कधीतरी तुमच्या धावपळीच्या आयुष्यातून वेळ काढून त्यांना पण वेळ द्या… जेव्हा ते रिटायर होतील तेव्हा त्यांना काही कमी पडू देऊ नका.. त्यांना जास्तीत जास्त खुश ठेवण्याचा प्रयत्न करा. तुम्ही मोठे आणि कमावते झालात म्हणून त्यांना कमी लेखू नका.
तर हे झाले आई वडिलांविषयी, आता आपण बोलू बाकी गोष्टींवर. आता आपण अजून काही नेहेमीच्या वापरत वापर होणाऱ्या  अवयवांबद्दल बोलू.
आपल्याला देवाने दोन हात, पाय दिले आहेत याचे तुम्हाला कधी नवल वाटते का? नक्कीच नाही…… पण त्या हाताची किंमत काय असते ते एका अपंग झालेल्या व्यक्तीला विचारा.. तो तुम्हाला त्याचे महत्व नक्की सांगू शकेल. किंवा असे दृश्य डोळ्यासमोर आणा कि उद्या तुमचे दोन्ही हात तुम्ही एका अपघातात गमावले, तर…? (देव करो असे कोणाबरोबरही नको होऊ देत) तेव्हा जेवताना, लिखाणाची आठवण आली कि, शी-शु ला गेले कि, कधी काही खेळावेसे वाटले कि, कधी समोर काही फुल दिसली कि (स्पर्श करावेसे वाटणे) याची काय किंमत असते ते जाणवेल तुम्हाला. तसेच पायाचे पण आहे. आपल्या शरीरातील प्रत्येक भाग महत्वाचा आहे आणि प्रत्येक भागाचे महत्व आपल्याला तो भाग दुखायला लागला , किंवा त्याला काही इजा झाल्यावरच जाणवते.
आपण सहज बाहेर फिरून आलो आणि कोणी आपल्याला विचारले, कुठे जाऊन आलास? काय पाहिलेस? तर आपण बोलू काही खास नाही, पण तेच तुम्ही एका अश्या व्यक्तीला विचारले जो काही दिवापुर्वी आंधळा होता आणि नुकतेच त्याला दिसायला लागले तर तो सांगेल कि मी बरीच सुंदर सुंदर झाड पहिले, रंगीबेरंगी फुले, सगळ्यांचे चेहऱ्यावरचे भावना, आणि अजून बरेच काही सांगू शकेल, जे कदाचित मी नाही सांगू शकत. आयुष्यात आपण रोज दिसणाऱ्या गोष्टी म्हणून बऱ्याच गोष्टी डोळ्यासमोर असून लक्ष देत नाही. प्रत्येक गोष्ट बारकाईने लक्ष देऊन, सर्व गोष्टींचा आनंद लुटा. एवढी वर्ष शरीराच्या प्रत्येक अवयवाने साथ दिली म्हणून आपण जगण्याचा आनंद लुटू शकलो, त्या शरीराचे आभार माना आणि हात, पाय नीट आहेत तो पर्यंत सगळीकडे फिरून, सगळ्या गोष्टींचा अनुभव घेऊन आनंद लुटण्याचा प्रयत्न करा. आपले जीवन जास्त दिवसाचे नाही म्हणून एखादी गोष्ट म्हातारपणीच करावी म्हणून ठेवू नका, कोणाला माहित म्हातारपण बघण्यासाठी आपण जगू पण कि नाही ते?
तुम्हाला जर एके दिवशी कळाले कि आता फक्त ८ दिवस तुम्ही जगणार आहात, तर ते ८ दिवस तुम्हाला कसे जगायला आवडतील? तसाच रोजचा दिवस जगायला शिका. रोज जमेल तेवढे जास्तीत जास्त आनंदी राहा. आजकाल आपण लहान-लहान गोष्ठीना जास्त महत्व देऊन स्वतःला दुःखाच्या दोऱ्यात अडकवून घेतो.  अशा गोष्ठीकडे दुर्लक्ष करायला शिका, आणि आनंदी राहून या जीवनाची मज्जा घ्या. आयुष्य खरच खूप सुंदर आहे, ते बघायला शिका.
Advertisements
Posted in Uncategorized | 1 Comment

जबाबदारी

मला सगळे प्रभा आत्या म्हणतात, माझा नवरा वारून २ महिने झाले तेव्हा पासून मी जोशिकाकांच्या घरी काम करत होती, कारण मला कामाची गरज होती आणि त्यांचा बायकोला क्यान्सरचा त्रास होता. त्यांना २ मूली आणि १ मुलगा होता. १ मुलगी १८ वर्षाची आणि, बाकी दोघे १० आणि १२ वर्षाचे होते. त्यांची बायको क्यान्सरच्या शेवटच्या टप्प्यावर होती आणि डॉक्टरने सांगितले होते कि त्या ३-४ महिन्यापेक्षा जास्त नाही राहणार. आणि ३ महिन्यांनी त्या पण वारल्या. मग त्यांच्या मुलांना मीच जीव लावला, त्यांची काळजी घेतली. सगळे खूप छान चालू होते. जोशी काका नेहेमी म्हणायचे कि “प्रभाताई हे आमचे घर नाही तर १ मंदिर आहे”. आणि खरच त्यांचे घर खूप सुंदर होते, अगदी मंदिरासारखेच पवित्र वाटायचे तिथे. कारण घरात आल्यावर समोर देवीची मोठी मूर्ती होती, खूपच सुंदर आणि रोज तिला ताजातवाना घातलेला हर, तिथे दिवा आणि अगरबत्ती जवळजवळ २४ तास चालू असायची म्हणून घरात आल्या आल्या खूप पवित्र वाटायचे.. ३ वर्ष झाली होती, त्यांच्या मोठ्या मुलीचे कॉलेज पूर्ण झाले होते, आणि ती पुढील शिक्षणासाठी तयारी करत होती, तेव्हाच तिच्या बाबांच्या मित्राने तिच्यासाठी १ स्थळ आणले, मुलाने (अमितने) तिला पसंद केले आणि तिने नापसंद करण्यासारखे मुळात काहीच नव्हते, पण तिला पुढच्या शिक्षणासाठी वाईट वाटले. पण तिची होणारी सासू तिला म्हणाली कि लग्नानंतर तुझे शिक्षण चालू ठेवू शकते, तेव्हा तिला जरा बरे वाटले आणि तिने पण लग्नाला होकार दिला. आम्ही सगळे खूप आनंदी होतो आणि सगळे मिळून तिच्या लग्नाची तयारी करत होतो, जोशी काका खूप जास्तच खुश होते. ते मला बोलले कि आत्ता लग्न एकदाचे उरकून जात नाही तो पर्यंत तुला आणि मला अजिबात आराम नाही मिळणार. त्या दिवशी काकांनी १ मिनिट पण आराम नाही केला, पूर्ण दिवस त्यांची धावपळ चालू होती कारण लग्न २ दिवसावर आले होते, पण जराही कंटाळलेले दिसत नव्हते. काम करताना माझे घड्याळाकडे लक्ष गेले, तेव्हा रात्रीचे १०.३० झाले होते, म्हणून मीच काकांना बोलली, आत्ता आराम करून घ्या, सकाळी लवकर उठून आपण काम करू. म्हणून ते झोपायला गेले.
सकाळी मला घरचे काम आवरून यायला वेळच लागला. मला वाटले जोशी काका रात्री बोलल्याप्रमाणे लवकर उठून कामाला लागले असतील आणि माझी वाट बघून आत्ता पर्यंत त्यांना माझा राग पण आला असेल. पण हे काय, घरात मी गेली तेव्हा सगळीकडे शांतता, मी त्यांच्या मोठ्या मुलीला (मोनिकाला) विचारले, काका कुठे आहेत? मोनिका मला प्रभा आत्या बोलायची. तर ती बोलली कि कदाचित ते उठले नाहीत अजून, काल खूप धावपळीमुळे थकले असतील म्हणून झोप लागली कदाचित त्यांना. मी तिला सांगितले त्यांना उठव, नाहीतर का उठवले नाही त्यांना म्हणून आपल्यालाच ओरडा बसेल, तेव्हा ती त्यांना उठवायला गेली, तिने पप्पा उठा, खूप वेळ झाला….. बोलत, पडदा उघडला, पण काकांचे काहीच उत्तर आले नाही, म्हणून तिने घाबरून मला आवाज दिला, मी पळत गेली, तेव्हा त्यांचे अंग खूप थंड पडले होते, कदाचित हृदयाचा झटका येऊन त्यांचे प्राणपाखरू झोपेतच गेले होते. तिच्या वडिलांच्या शेवटच्या कार्यासाठी तिचे काका, काकु आले होते, ते सगळ्यासमोर तर मुलांशी खूप चांगले वागत होते म्हणून मोनिकाची होणारी सासू तिला बोलली कि काका काकू तुझ्या बहिण भावांची चांगली काळजी घेतील, आपण तुमचे लग्न १५ दिवसानंतर उरकून टाकू. पण तिने तिच्या काका-काकुंचे घरातले वागणे पहिले आणि ती घाबरली, तेव्हाच तिने ठरवले कि आपण या दोघांना काका-काकुकडे सोडायचे नाही, आपण या दोघांना सांभाळायचे. मी तिला बोलली कि पाहिजे तर मी सांभाळेन या दोघांना, तेव्हा ती म्हणाली, कि “प्रभा आत्या, मी फक्त १ मुलगी आहे म्हणून या दोघांना आई बाबा नसताना एकटे सोडून का जाऊ, मला नाही पटत, मी यांना असे वाऱ्यावर टाकणार नाही”. मी तिला विचारले कि तु कसे पार पडणार हे सगळे? असे झाले तर लग्न कधी करणार? ती बोलली लग्नाचे तर माहित नाही, पण आत्ता मी या दोघांना असे सोडून जाणार नाही हे नक्की. हि असे बोलली खरे, पण मला तिची काळजीच वाटत होती. तिने लगेच काका काकुना जायला संगितले, आणि स्वतःने संगीताचा क्लास चालू केला, तो संध्याकाळी घ्यायची आणि दिवसा ती कामाला जाऊ लागली, तिने अगदी बोलाल्याप्रमाणेच सगळे सुरु केले, तेव्हा रविवारी सुट्टीच्या दिवशी अमित घरी आला होता, तिला सहज भेटायला, तेव्हा त्याने लग्नाचा विषय काढला, तिने पण त्याला तेच सांगितले जे मला सांगितले. ती त्याला सरळ बोलली कि तु दुसरे लग्न करू शकतोस. तो बोलला कि मी तुला सोडून कोणाशी लग्न नाही करणार, तुझा होकाराची वाट बघेन, आणि हे फक्त मोनिका, अमित आणि मलाच माहित होते, मोनिका मला बोलली कि हे माझा बहिणीला (राणीला) किंवा भावाला (महेशला) कळू देऊ नका.
तिने खरच बोलल्याप्रमाणे स्वतः मेहनत करून भावा-बहिणीचे शिक्षण पूर्ण केले. एकदा महेश सहज बाहेर गेला होता, तेव्हा त्याला घरी येताना रस्त्यात अमित भेटला. तेव्हा अमितनेच त्याला ओळख दाखवली, आणि कसा आहेस विचारले? तेव्हा तो बोलला, मी बरा आहे, पण तुम्ही एकटेच? तो बोलला हो मी अजून लग्न केले नाही, अजून पण तुझ्या ताईची वाट बघतोय. महेशला हे ऐकून नवलच वाटले कि हा अजून कसा वाट बघतोय? म्हणून तो सरळ अमितला घेऊन घरी गेला, आणि ताईला बोलला कि ताई आत्ता मी मोठा झालो आहे, आता तु आमची काळजी करणे सोड आणि अमितशी लग्न कर. ती बोलली कि आधी तु लग्न कर, या घराला सांभाळणारी घरात येऊ दे, मग मी विचार करेन. मोनिका ला माहित होते कि महेश ला १ मुलगी आवडते, म्हणून तीच त्याला बोलली कि तु तिच्याशी लग्नाविषयी बोल, आपण तुझे लग्न लगेच उरकून टाकू. तेव्हा महेश बोलला, कि ती जरी मला आवडत असली तरी ती खूप श्रीमंत घरातली आहे, म्हणून मला तिच्याशी लग्न नाही करायचे. पण मोनिकाने हट्ट करून हे लग्न लावले.
पण शेवटी महेश बोलला होता तेच खरे झाले. त्याच्या बायकोला त्यांचे घर, त्यांचा परिसर, त्यांचे राहणीमान हे सगळे जुन्या पद्धतीचे वाटू लागले. ती महेशला बोलली पण कि मला ऑफिस कढून १ घर मिळाले आहे, ते खूप छान परिसरात आहे, आपण तिथेच राहायला जाऊया का? पण महेश नको बोलला. नंतर एक आठवडाभर कोणत्या ना कोणत्या गोष्टीवरून घरात रोज भांडण सुरु होते, शेवटी तिने घर सोडून जाण्याचा निर्णय घेतला, जाताना महेशला बोलली कि तु पण घर सोडून येणार असशील तर आपण ऑफिस ने दिलेल्या घरात राहू, आणि येताना मात्र सगळी नाती इथेच कायमची तोडून यायची. त्याने नकार दिला, तिला बोलला तु जाऊ शकतेस, डोके जागेवर आले कि ये घरी. पण मोनिकाने मात्र तिला थांबवले आणि महेशला तिच्यासोबत जा म्हणून सांगितले. महेशची इच्छा नसताना त्याला घर सोडून बायकोबरोबर वेगळे राहावे लागले. महेशला मात्र खूप वाईट वाटले, कारण त्याला मोनिकाची केलेल्या कष्टाची खूप जाणीव होती. आणि आपल्यामुळे ती परत एकटी पडणार याची भीती वाटत होती आणि तिने आपल्यासाठी एवढे कष्ट करून आपण तिला दुखावून एकटे सोडून जाणार याचे वाईट वाटत होते.
तसे मोनिकाने ठरवले होते कि महेशचे लग्न झाले कि आपण अमितबरोबर लग्न करावे, पण आत्ता महेश हे घर सोडून गेल्यामुळे तिच्यावर राणीची जबाबदारी आली होती. तिला तिच्या पुढच्या शिक्षणासाठी परदेशी जायचे होते. म्हणून मोनिकाने कर्ज काढले आणि राणीला परदेशी पाठवायची तयारी केली. योगायोगाने असे कळाले कि ती जिथे शिक्षणासाठी जाणार होती तिथेच यांचे जुन्या ओळखीचे भागवत काका (पाप्पाचे मित्र) राहत होते. मोनिकाने त्यांना फोन करून राणी बद्दल सांगितले, आणि त्यांना राणी आधीपासूनच आवडत होती. ते बोलले कि आम्ही तिची काळजी घेऊ, तू काळजी नको करूस. तेव्हा मोनिका त्यांना म्हणाली कि जमले तर महिन्यातून एकदा तुम्ही राणीला भेटत जा, तिला बरे वाटेल तुम्हाला भेटून. तेव्हा ते काका मोनिकाला बोलले कि राणीला आम्ही आमची सून म्हणून आमच्या घरात कायम राहू दिले तर नाही चालणार का? तेव्हा मोनिकाला गोड आश्चर्याचा धक्का बसला. मोनिका काकांना बोलली कि आधी तुमच्या मुलाने राणीला पसंद तर केले पाहिजे. तेव्हा काका बोलले कि तो माझा शब्दाबाहेर जाणार नाही. आणि तसेच झाले. ते लोक राणीला बघायला दुसऱ्या आठवड्यात आलेच. आणि त्या मुलाने राणीला पसंद पण केले. याच वेळी तिकडे महेशची बायको गरोदर होती आणि रक्षाबंधन पण होते. तेव्हा मोनिकाने  राणीच्या लग्नाचे कळवण्यासाठी महेशला पत्र पाठवले. आणि पत्रासोबत राखीपण पाठवली आणि त्यात हे पण लिहिले होते कि “तुझा बायकोची काळजी घे, तिला त्रास देऊ नकोस. तिला वाईट वाटेल असे काही करू नकोस. आणि आमच्या दोघीकडून हि राखी आहे, ती बांधून घे”. हे पत्र वाचून आणि राखी बघून महेश स्वतःच्या डोळ्यातले पाणी थांबवू शकला नाही, आणि हे सगळे त्याच्या बायकोने पहिले, तेव्हा तिला जाणीव झाली कि महेशला त्याच्या बहिनिपासून दूर करून आपण किती मोठी चूक केली आहे म्हणून. एवढे समजून पण ती महेशला बोलली कि पाहिजे तर तू जाऊ शकतोस लग्नाला, पण मी नाही येणार. तेव्हा महेश बोलला कि ताई ने मला तुझी काळजी घ्यायला सांगितली आहे, आणि ज्या गोष्टीने तुला वाईट वाटेल असे मी काहीच करणार नाही.
तेव्हा लगेच भागवत काकांनी, या दोघांचा साखरपुढा आणि लग्नाची तारीख पण काढली होती. आणि हि तारीख महेशच्या बाळाच्या जन्मानंतरची होती. महेशच्या सासऱ्यांनी त्याच्या बायकोला समजावून राणीच्या लग्नाला महेच्या खुशीसाठी जा म्हणून सांगितले. आणि तिलाही पाप्पाचे बोलणे पटले. आणि तिने पण राणीच्या लग्नाला जायची तयारी केली. हे सगळे महेशला कळाले तेव्हा महेशला खूप खुश झाला, आणि तो जाऊन सरळ अमितला भेटला. त्याने अमित ला सांगितले कि राणीच्या लग्न नंतर मोनिका ताईच्या सगळ्या जबाबदाऱ्या संपतील आणि ती एकटीच राहील, आणि मला तिला एकटे नाही राहू द्यायचे म्हणून माझा असा विचार आहे कि आपण दोन्ही बहिणींची लग्न एकाच दिवशी लावावीत आणि हि कल्पना अमितला पण आवडली. आणि त्याने लग्नाची तयारी सुरु केली. पण हे सगळे फक्त महेश, अमित आणि अमितच्या घरीच माहित होते. अमितच्या घरून लग्नाची जोरदार तयारी सुरु झाली. आणि तिकडे मोनिका आणि राणी मिळून राणीच्या लग्नाची तयारी करत होत्या. महेशने आणि अमितने ठरवले होते कि मोनिकाच्या लग्नाची बातमी तिला कळू द्यायची नाही, आपण तिला १ सुखद धक्का देऊ.
राणीला अशी अपेक्षा होती कि महेश आणि त्याची बायको आपल्या लग्नाला येणार नाहीत. आणि आपल्या लग्ना नंतर तिचे काय होणार याची चिंता पण तिला लागली होती. पण मोनिकाने मात्र महेश या लग्नाला येणार हे गृहीत धरून महेशाला, त्याच्या बायकोला आणि बाळाला पण आहेर आणला होता. आणि तो आहेर घेताना राणी चिडून मोनिकाला बोलली, कि ते नाही येणार आहेत माझा लग्नाला हे मला माहित आहे मग तू का हि खरेदी करतेस? नको करूस हे सगळे ज्याने तुला जास्त त्रास होईल. तरीपण मोनिकाने आपली वेडी आस सोडली नाही. आणि बघता बघता राणीच्या लग्नाचा दिवस जवळ आला. तिच्या लग्नाच्या शेवटच्या दिवशी पण मोनिकाची धावपळ चालूच होती, तेव्हा राणीने न राहवून मोनिकाला विचारलेच कि माझा लग्ना नंतर तू काय करणार? तेव्हा ती बोलली कि मी प्रभा अत्यासोबत राहीन इथेच. हे ऐकून राणीला रडू आवरले नाही आणि ती मोनिकाच्या गळ्यात पडून जोरजोरात रडू लागली.
शेवटी राणीच्या लग्नाचा दिवस उजाडला, त्या दिवशी राणी आणि मोनिका दोघी पण खूप आनंदी होत्या. पण मोनिका राहून राहून सारखे मंडपाच्या दरवाजाकडे बघत होती. याच अपेक्षेने कि महेश येईल. आणि इतक्यात मी महेशला येताना पहिले आणि आत जाऊन मोनिकाला सांगितले, मोनिका हसत हसत हातातले काम सोडून धावत बाहेर आली, आणि बघते तर काय, महेश एकटा आला नव्हता आणि सोबत बायकोला, बाळाला आणि अमितला हेऊन आला. अमित ला बघून मोनिकाला काहीच कळत नव्हते, तेव्हा महेश पुढे येऊन मोनिकाचा हात पकडून बोलला कि आत्ता तुझ्या सगळ्या जबाबदाऱ्या संपल्या, आणि आज मी राणीसोबत तुझे पण लग्न लावणार आहे. हे ऐकून मोनिकाला खरच आनंद आणि आश्चर्य वाटले आणि तिने डोळ्यातले पाणी पुसत हसून महेशाला घट्ट मिठी मारली. तेव्हाच महेशच्या बायकोने पण मोनिकाची माफी मागितली. आणि महेशने ठरविल्याप्रमाणे राणीबरोबर मोनिकाचे पण लग्न लावले. आणि माझी पोरगी सुटली एकदाची सगळ्या जबाबदारीतून. मला खरच त्या पोरीचा खूप हेवा वाटतो, तिचे किती कौतुक करावे ते कमीच आहे. आजच्या युगात कोणती बहिण आपल्या बहिण भावासाठी एवढा त्याग करेल? देव करो अशी वेळ कोणावर पण नको येऊ देत, पण असे जीव लावणारे बहिण भाऊ मात्र सगळ्यांना मिळू देत.
Posted in Uncategorized | Leave a comment

मुंबई ते दुबई

माझं लग्न झाले, आणि काही दिवसातच परदेशात जाण्याचा योग आला. आता काही दिवसात परदेशात जाणार हे कळले तेव्हा माझे पाय जमिनीवर नव्हते. पण हा आनंद सांगणार तरी कोणाला? म्हणून कोणाला काहीच बोलली नाही. पण मनातल्या मनात खूप खुश होते मी. मला लहानपणापासून इच्छा होती कि आयुष्यात एकदा तरी मी परेदेशात फिरून यावे. पण आत्ता जाणार ते लग्न झाल्या झाल्या, म्हणून जेवढी ख़ुशी तेवढीच भीती पण वाटत होती, कि नवरा इथे आल्यावर लगेच कामाला जाणार होता, मग मला करमेल का घरी? मी काय करेन दिवसभर? एकतर अनोळखी शहर. तसे आम्ही दोघेच नव्हतो येणार परदेशात, माझा सासूबाई पण येणार होत्या, पण शेवटी या पण नवीन माझासाठी आणि मी पण नवीन त्यांच्या साठी, म्हणून खूप कसेतरी वाटत होते.
मी लग्न झाल्यावर खूप खुश होते परदेशात लवकरच जाणार म्हणून, पण जसा जसा परदेशात जायचा दिवस जवळ येत होता तसे जास्त काळजी वाटत होती, मी ठरवले होते कि मी जायच्या अधि रडणार नाही. परेदेशात जायच्या आधी, जमेल तेवढ्या सगळ्या मैत्रिणींना भेटून घेतले, सगळ्यांना फोन केले, सगळ्यांशी बोलून खूप बरे वाटले, पण जेव्हा आई पप्पा ना भेटायला म्हणून घरी जावून आली तेव्हा धरून ठेवलेला बांध सुटला आणि निघताना मात्र पप्पाना मिठी मारून खूप रडली, जसे जसे विमानतळ जवळ येत होते तेव्हा पण रडणार नाही ठरवले, पण शेवटी आई पप्पा ना आत्ता कधी बघू शकेन हा विचार डोक्यात आला आणि रडू आवरू शकले नाही.
शुक्रवारी विमानानं ‘टेक ऑफ’ केला आणि शनिवारी सकाळी २.३० ला आम्ही दुबईला पोहोचलो. रविवार पासून नवऱ्याने ऑफिस जॉईन केले. मला मात्र अजिबात करमत नव्हते. काय करू कळत नव्हते, पण माझं नशिबाने माझी सासू चांगली निघाली, आम्ही दोघी खूप गप्पा मारायचो, नंतर मला माझं नशिबाने मराठी ब्लॉग मिळाला, नंतर नेट वरच मराठी कादंबऱ्या मिळाल्या, त्यामुळे वाचनात आणि गप्पा मध्ये दिवस कसा निघून जायचा ते कळत नव्हते. आणि आई पप्पा बरोबर विडीओ चत करायला मिळायचे, म्हणून रोज त्यांना बघून बोलू शकत होती म्हणून करमत होते.  पण शेवटी थोडावेळ पण एकटी असली कि लगेच मैत्रिणींची आठवण येते, आई पाप्पाची, दादाची आठवण येते. इथे कोणालाच भेटू शकत नाही म्हणून खूप कसे तरी वाटते. मला इथे येऊन आता ३ महिने होतील, या ३ महिन्यात मी बऱ्याच ठिकाणी फिरले, तरी नवऱ्याला शुक्रवार, शनिवार सुट्टी असते, आणि शुक्रवारी सकाळी त्याच्या कंपनीची म्याच असते, तिथे पण आम्ही मिळून जातो… आम्ही हे २ दिवस जमेल तेवढे जास्त एन्जोय करून घेतो. खूप मज्जा येते आता, पण शेवटी आपला देश (भारत) तो आपला देश, भले किती पण घाण असो, किती पण गर्दी असो आणि आपली माणसे किती पण त्रास देणारी असो, पण या सगळ्यापासून जेव्हा दूर राहतो ना, तेव्हा त्यांचे महत्व आपल्याला जास्त जाणवते हे खरे आहे.
मी इथे आल्यावर, जगभरातली सगळ्यात उंच इमारत (बुर्ज खलिफा) पहिली, डॉल्फिन शो पहिला, बरेच प्राणी संघ्रहालय पहिले आहेत, त्यात बरेच प्राणी मी माझा आयुष्यात पहिल्यांदा इतक्या जवळून पहिले आहेत. दुबई मध्ये जवळ जवळ आर्धे तर भारतीय लोक राहतात. इथे काही गोष्टी माझा निदर्शनास आल्या, त्या म्हणजे १) तेच भारतीय लोक जे भारतात असताना कुठे पण कचरा टाकतात, तेच इथे नाही चालत म्हणून फक्त कचरा कुंडीतच कचरा टाकतात. २) मुंबई सारख्या ठिकाणी, बऱ्याच वेळा, पुरुष (रेल्वे मध्ये, बस मध्ये) सीट वर बसलेले असतात, आणि बायका उभ्या असतात, तेच पुरुष इथे बायकांना बसायला जागा देण्यासाठी बसलेले उठतात. इथल्या बायकांना मान देतात. ३) चालत्या गाडी समोरून कोणी चालत जात असेल तर गाडी चा स्पीड कमी करून आधी चालणाऱ्या लोकांना (मान देऊन) जाऊ देतात, भले मग त्यांना किती पण घाई असो. ४) आमच्या घराजवळ एक बाग आहे, तसे दुबई म्हणजे एक वाळवंट, पण इथे त्या बागेत सगळीकडे हिरवी झाडे बघायला मिळतात, आणि रस्त्यावर पण दोन्ही बाजूला पूर्ण हिरवळ असते… नेहेमी वेगवेगळ्या रंगाची फुले लावलेली असतात फुटपाथच्या बाजूला…इथे पाणी विकत आणून पितो आम्ही, पण झाडे आणि त्यांची हिरवळ इथे खूप चांगल्या पद्धतीने जपली आहेत…. आणि हि सगळी कामे जोपासणारी लोक आहेत “भारतीय”…..  अगदी टीव्ही सीरिअल मध्ये बघतो तसेच आहे सगळे इथे….    अजून बऱ्याच गोष्टी आहेत अशा सुंदर आणि सांगण्यासारख्या….. मला असे मनात येऊन गेले कि आपल्या याच लोकांनी याच गोष्टी भारतात केल्या, तर भारत सुधारायला आणि सुंदर व्हायला जास्त वेळ नाही लागणार. हेच मी माझ्या नवऱ्याला पण सांगितले, तर त्याने काय बोलावे, तो बोलला कि प्रत्येक जण आपल्या घरी मस्ती करतोच कि, पण जेव्हा आपण दुसऱ्यांच्या घरी जातो तेव्हा किती छान वागतो, शांत राहतो, हे अगदी तसेच आहे. मला पण पटले, पण खरच आपल्या स्वतःच्या देशात पण सगळे असेच वागलो तर आपला भारत देश सुंदर व्हायला जास्त वेळ नाही लागणार.
Posted in Uncategorized | 2 Comments

अंधश्रद्धा

तुमचा राशीभविश्यावर विश्वास आहे का? माझा तरी नाही, जुन्याकाळात सांगितलेले भविष्य खरे ठरायचे कारण तेव्हाचे लोक तेवढा खोल अभ्यास करायचे, त्यांना खरच तेवढे ज्ञान होते.पण आजकाल सगळेजण भविष्य संगाण्य्साठी जन्मदिवस आणि वेळ विचारतात आणि एका पुस्तकात बघून भविष्य सांगतात. आता मला तुम्हीच सांगा, एक दिवसात एकच वेळी जगात किती जण जन्माला येत असतील? किंवा एका राशीत कितीजण मोडत असतील. म्हणून त्या सगळ्यांचे नशीब किवा भविष्य काय एकच असेल काय?

आजकाल तर चक्क लग्न जमवण्यासाठी पत्रिका पाहायचे खूळ डोक्यातआहे भरपूर लोकांचा,आणि अजून पण त्यावर विश्वास ठेवतात कसे हे मोठे नवलआहे. तसे हे खूळ बरच जुने आहे आणि ते परंपरेनुसार आत्ता पण बघतात. पण परत तोच प्रश्न, पत्रिका जुळवतात हि पुस्तके बघून, आणि एकच पुस्तकातून ४ जण गुण जुळवतात म्हणून गुण जरी सारखे निघाले तरी भविष्य सांगताना मात्र ४जण वेगवेगळे सांगतात,हे कसे शक्यआहे हे अजून मला कळले नाही. तुम्हाला काळे असेल तर मला नक्की सांगा. हा माझा वैयक्तिक अनुभव आहे म्हणून विचारले. पण शेवटी एकाचे पण खरे होत नाही. एवढे कळूनपण आमचा कडे रोज पेपर वाचतात ते भविष्य बघण्यासाठी.

आज काल सगळ्यांनी भविष्य बघणे हा एक व्यवसाय बनवलाआहे, भविष्य सांगून पैसे घेतात खरे पण खरं काहीच होत नाही, माझा घराजवळ १ भडजी राहतो, त्याने भविष्य सांगून एवढा पैसा कमावलाआहे कि त्याने मुंबई मध्ये नवीन घर घेतले.ते पण२ बेडरूमचे, आज मुंबई मध्ये घर घेणे ते पण२ बेडरूमचे  किती महाग आहे हे मी तुम्हाला सांगायला नकोच. यापेक्षा अजून चांगले उदाहरण काय असेल? हे झाले पैसे कमवणे,आणि त्यांचा कडे माझी मैत्रीण दर ६ महिन्यांनी फेऱ्या मारते, तो तिला सांगतो कि पुढचा ६ महिन्यात तुझे लग्न होईल, असे ४ वर्ष निघून गेली पण अजून तिचे लग्न झालेच नाही. आणि लग्न होत नाही म्हणून तिच्या कढून दरवर्षी ३-४ हजाराची पूजा करून घेतो, तरीपण ती कशी विश्वास ठेवते हेच नवल,ते पण या युगात.आणि लग्न जमन्यासाठी, सुखी राहण्यासाठी भडजीची गरज कशालाआहे हेच मला कळत नाही. तुम्हाला कळत असेल तर मला नक्की कळवा .

मला तुम्हाला सांगायला आवडेल कि माझा पाप्पाचे एक मित्र आहेत, त्यांनी प्रेम-विवाह केला आहे म्हणून त्यांनी पत्रिका पहिलीच नाही,पण  त्यांच्या बायकोने लग्ना नंतर पत्रिका पहिली, तेव्हा त्यांना सांगितले कि तुमचे १२.५० गुण जुळत आहेत, आणि तुमची नाड एक आहे, त्यामुळे तुम्हाला मुल होणे शक्य नाही, आणि झालेतर अपंग होईल,आणि तुम्ही कधीच सुखी राहणार नाही. आज त्यांचा लग्नाला ३२ वर्ष झाली, त्यांना १ मुलगा आणि २ मूलीआहेत, मुलगा इंजिनीअर आहे आणि ५०-६० हजाराची नोकरी आहे त्याला सुरुवातीला. १ मुलीचे लग्न होऊन ती जर्मनीमध्ये सेटल झालीआहे, आणि दुसरीचे लग्न होऊन ती घरातच आहे कारण तिला नोकरीची गरजच नाही, ती पण लाखात खेळते. आणि या नवरा बायकोने नोकरीकरून एवढा पैसा कमावला आहे कि ते आता दरवर्षी मुलीकडे म्हणजे जर्मनीला जाऊन अजून १ बाहेरगावी टुर करतात. आता मला सांगा हे सुखी नाहीत का? यांची मुलं कशीआहेत?? आणि त्या भडजीने काय सांगितले होते? यावरून एकच कळते कि आजकाल भविष्य सांगणे हा फक्त एक व्यवसाय झाला आहे, कोणाचे काही खरे होत नाही, कोणाचा तेवढा खोल अभ्यास नाही. आणि लग्न करण्यासाठी मुलामुलीने एकमेकांना पसंद केले आणि घरून होकार असले म्हण्जे झाले त्यासाठी भडजीची काय गरज? आणि सुखी राहण्यसाठी तुम्ही इतरांना सुखी ठेवा,तुम्ही आपोआप सुखी होणारच हा निसर्गाचा अटळ नियम आहे.
तुम्ही कोणती पण गोष्ट खूप जिद्दीने आणि मन लावून केली तर तुम्ही तुम्हाला जे पाहिजे ते मिळवू शकता…. फरक इतकाच कि काही गोष्टी लगेच मिळतात तर काही उशिरा….. आणि यासाठी तुम्हाला जिद्दीची आणि तुमची जोरदार इछेची गरज आहे, भडजी ची गरज नाही. तुमचे नशीब घडवणे तुमच्या हातात आहे, भडजीच्या नाही. म्हणून सद्गुरू श्री वामनराव पै म्हणतात, “तूच आहेस तुझा जीवनाचा शिल्पकार.”


Posted in Uncategorized | 1 Comment

आईस्क्रीम

उन्हाळा हा खूप जीवघेणा असतो ना??? खूप घाम येतो, घामामुळे होणारी चीड चीड, खूप त्रासदायक असतो हा उन्हाळा.. नको नकोसा वाटतो हा उन्हाळा …… पण उन्हाळ्यात हवेहवेसे वाटते ते फक्त आईस्क्रीम. आहाहाहाहा ….!!! आईस्क्रीम चे नाव काढले कि कोणाच्या तोंडाला पाणी नाही सुटले तरच नवल. मला तर आईस्क्रीम नका खाऊ सांगणाऱ्या माणसांचा खूप खूप अगदी प्रचंड राग येतो , पण काही बोलू पण शकत नाही. तुम्हाला नसेल आवडत किवा नसेल खायचे तर शांत बसा ना ? मला का नको बोलता आईस्क्रीम खायला? यात किती मज्जा , किती आनंद असतो कसे सांगणार यांना ? त्यांचा पण मनात लाडू फुटत असतील पण डॉक्टर नको बोलतात आईस्क्रीम खायला त्यांना म्हणून आमच्यावर बंधने.
खरतर  आईस्क्रीम ला वेळेचे, काळाचे कशाचेच बंधन नसते . अगदी २ -३  वर्षांचा  मुलापासून ते अगदी आमची ८५ वर्षांची आजी पण आईस्क्रीम आवडीने खाते . आमचा इथे एक कुल्फी वाला येतो , पप्पा बोलतात , कि ते लहान होते तेव्हा पासून त्यांनी कुल्फी विकायला सुरुवात केली आहे पण आज पर्यंत त्याच्या कुल्फी च्या चवीत काडीमात्र फरक नाही जाणवत ….. एकदा खाल्ले  कि रोज खाविशीच वाटते ती कुल्फी आणि याचा योग यायचा तो उन्हाळ्यात . आम्ही आधी आईस्क्रीम , कुल्फी खाण्यासाठी उन्हाळ्याची वाट बघायचो ,त्यात पण घरात बंधन कि जास्त खाऊ नये , चांगले नसते , सर्दी होते म्हणून कधी कधी लपून छपून पण खायचो  आज काल तर कुल्फी, आईस्क्रीम हे अगदी रोज खाऊ शकतो (लपूनच). त्यासाठी उन्हाळ्याची वाट बघायची गरज नाही .
शाळेतून येताना गोळा खायला पण खूप मज्जा यायची  (तो पण लपूनच)… पण शेवटी वेगवेगळ्या रंगानी जीभ आणि दात लपवताना नेहेमी पकडली जायची मी आणि मग ओरडा खायची . पण लपून गोळा खाण्यात आणि पकडले गेलो कि ओरडा खाण्यात पण वेगळाच आनंद असतो  आता  तर  किती  वेगवेगळे  आणि  छान  छान  प्रकारची  आणि  चवीची आईस्क्रीम आले  आहेत.  आजकाल गोळा जास्त बघायला मिळत नाही, पण खूप आठवण येते त्या गोळ्याची. आईस्क्रीम मी अगदी ना चुकता रोज पण खाऊ शकते, मला प्रचंड आवडते  हे कोणी वेगळे सांगायची गरज नाही हे माहित आहे पण मनातले सांगितले. मी तर अगदी ३६५ दिवस आईस्क्रीम आवडीने खाऊ शकते. आय लव इट सो मच.

Posted in Uncategorized | Leave a comment

बालपण

“बालपण” या जगातली सगळ्यात सुंदर आठवण, बालपण म्हणाले कि पकडापकडी, खो-खो पासून अगदी विडीओ गेम, क्रिकेट पर्यंत सगळे विषय आठवतात. शाळेत केलेला दंगा, सुटीत केलेली मस्ती, गावाला केलेली मजा, आणि त्या बद्दल खाल्लेला मार सगळे काही नीट आठवते, कारण ते दिवस असतात सोनेरी.

“बालपण दे रे देवा, मुठी गोड साखरेचा रवा” उगीच नाही म्हणत. ते आयुष्य म्हणजे खूप छान आणि गोड, जिथे स्वार्थ नसतो, खोटेपणा नसतो, फसवेगिरी नसते, अभिमान नसतो. बालपण म्हणजे आयुष्यातला सगळ्यात सुंदर काळ, ना काळजी, ना चिंता..!! बालपण म्हणजे फक्त मज्जा असे माझे समीकरण होते, त्यात घरात सगळ्यात लहान म्हणून खूप लाड झालेच. आजकालच्या मुलांना बघून वाटते त्यांचे बालपण हरवले… कारण खूप लहान वयात ते खूप जास्त व्यस्त दिसतात. प्रचंड अभ्यास, सगळे क्लासेस. आजकाल आमचा सोसायटी मध्ये आमचा सारखी खेळणारी मुळे फक्त मे महिन्यात दिसतात, त्यात पण काही जण तेव्हा गावी जातात. शाळेत जतन त्याच्या वजनापेक्षा दप्तराचे वजन जास्त असते. आज काल स्पर्धा पण एवढी वाढली आहे कि लहान मुलांनी त्यांचे लहानपण हरवले आहे असे वाटते.

लहानपणी पप्पाना ओफ़िस् ला जाताना पहिले कि असे वाटायचे कधी एकदा मोठे होऊ, अणि हातात ब्याग घेउन कामाला जाऊ…..?? अणि आता वाटते, का आपण मोठे झालोत? लहानपनी काही पण करा, काही पण बोला,…. कोणी काहीच बोलत नाही, आता मोठे झाल्यावर कळते कि लहानपण किती गोड असते. माझा लहानपनी मी खुप धमाल केलि आहे, त्यातले काही क्षण माला तुम्हाला सांगायला मज्जा येइल…..,

१) आमचा सोसायटी मधे आमचा सगळ्यात मोठा ग्रुप होता, आम्ही रोज काही तरी नविन वाटेल असे गेम खेलायाचो…., अणि त्यात सगळ्यात मोठी मीच, त्यामुळे खुप धमाल यायची, जसे कधी सायकलची रेस, कधी क्रिकेट, कधी खो-खो, असे बरेच गेम खेळायचो,. क्रिकेट खेळताना मी सगळ्यात पहिले माझाच घराची काच फोडली होती, नंतर एकदा पहिल्या मजल्यावर रहाणाऱ्याची काच फोडली होती….. असे किती तरी वेळा काचा फोडून, घरातून पैसे काढून सगळ्यांचा काचा परत बसवून द्यायचो. माझा घराला जेवढ्या काचा होत्या त्या सगळ्या काचा मी जवळ जवळ २-३ वेळा फोडून परत बसवल्या 😀

२) मी शाळेत खुप शांत बसायची, माझे शाळेत जास्त मित्र मैत्रीण नव्हते, मी शाळेत रोज पाण्याची बोटल घेउन जायची, एके दिवशी मला एकाने मस्करीत सांगितले की तू उद्या १ लीटर पाण्याची बोटल घेउन ये, अणि मी खरेच घेउन गेली होती……. अणि मधली सुट्टी झाली तेव्हा ती पाण्याची बोटल एका मुलीने मागितली, तिने पानी पिउन झाल्यावर ती मला परत करण्यासाठी माज़ा बाजुचा बेंच वर बसलेल्या मुलाजवळ फेकली, मी त्याला बोली दे मला, मी ठेवून देते बोटल… त्याने माझे ऐकले नाही अणि ती बोटल मला न देता तो अणि त्याचा मित्र क्याच-क्याच खेळत होते, ते पण शेवटचा बेंच वरुण पहिल्या बेंच वर, मी बोली नको खेलूस, काही झाले तर माझे नाव येइल म्हणून, त्याने ऐकले नाही अणि तो खेळत राहिला. शेवटी त्याने खेलता खेलता एका मुलाचा चस्मा फोडला, त्या मुलाने पाहिले होते कोणी फोडला पण त्याने मात्र टिचरला एवडेच सांगितले की माज़ा चस्मा या बोटल मुले फुटला, टिचरने विचारले की कोणाची बोटल आहे ही, अणि सगाल्यानी मिळून बोट माझा कड़े दाखवले, अणि मी काही बोलायचा आधीच त्यानी मला सरळ प्रिन्सिपल च ऑफिस मधे नेले, त्यानी मला सांगितले की तुला याचा चस्मा भरून द्यावा लागेल, मी बोली मी का भरू जो मी फोडलाच नाही???? ते बोलले ,उद्या आई बाबा न घेउन ये शाळेत, तय नंतर मी 3 दिवस शाळेतच नाही गेली, ४ थ्या दिवशी माजी चुलत बहिन सीमा ला सांगितले की कांचन च आई बाबाना बोलावून आन शाळेत, तिने सांगितले आम्ही तिचा आई बाबाशी बोलत नाही जे खोटे होते……. मग त्याच दिवशी तिने मला येउन सांगितले की त्याने नविन चस्मा बनवला आहे, मग मी शाळेत गेली…….

३) आमचा घरात १ मामा आहे, ज्याला मी, माझे आई बाबा, माझा दादा आम्ही सगलेच त्याला मामा बोलतो….. अणि लाड़ाने मामू बोलतो, तो जेवण जाले की आम्हाला घेउन मैदानात जायचा, जाताना सोबत चटाई घेउन जायचो ( बसायची सोय म्हणून )…….. आम्ही घरी मिळून क्यारम खेलायचो….. तेव्हा मी अणि पप्पा पार्टनर अणि मामू अणि आनंद (माझा भाऊ) पार्टनर, अणि नेहेमी पप्पा अणि मीच जिन्कयाचो तर हे दोघे जिन्कन्यासाठी चीटिंग करायचे, उदाहरण म्हणजे मामाचा डाव आला की मामा उजव्या हातात स्ट्रायकर पकडून, पप्पाना काही तरी सिरिअस गप्पा काढल्या सारखे मग्न करून किव टीवी मधे काय मस्त दाखवत आहे बघा बोलायचा अणि पप्पाचे अणि माझे लक्ष दूर करून डाव्या हाताने १ सोंटी पोक्केट मधे टाकुन द्यायचा…….. आम्ही त्याला नेहेमी पकदयाचो पण तो एवढा निरागस चेहरा करून बोलायचा की नाही मी कशी चीटिंग करेन????? तुमचे लक्ष नाही खेळात …. मगाशी पण एवढ्याच सोंगट्या होत्या क्याराम वर….. आणि बोलताना पण असे तोंड करून बोलेल कि तुम्ही शंका पण घेणार नाही कि हा खोटे बोलत असेल म्हणून….. हेहेहेहेहेहे

४) मी आणि माझी मैत्रीण अनघा, आम्ही एकाच शाळेत आणि क्लास मध्ये होतो, आम्हाला मुलांशी भांडायला, त्यांची टांग खेचायला जाम आवडायचे….. तर आम्ही क्लास मध्ये एकदा किरण नावाचा मुलाला पिडले होते नेहेमीप्रमाणे, आणि त्यावेळी सायकल चे भूत सावर होते माझावर, आणि नेमकी किरण ने त्या दिवशी सायकल आणली होती, मी त्याला बोली मला सायकल चालवायची आहे, तो मला बोला तू तर नेहेमी चालवते, आज अनघा ला घेऊन डबल सीट ट्राय कर, मी खुशीने हो बोली आणि अनघा पण तयार झाली बसायला आणि या हिरोने मला ब्रेक निघालेल्या सायकल वर बसवले, मी मस्त मोठी फेरी मारली मैदानाला, आणि थांबायचा वेळी ब्रेक दाबला तर काय????? सरळ दोघी पण कचरा पेटीत जाऊन पडलो,…………. (आणि किरण आनंद लुटत जोरजोरात हसत होता) कारण त्याला मी आणि अनघा कधी सुखाने बसू देत नव्हतो.

लहानपणी (१ वर्षाचा आधी) आपण कसे होतो आपल्याला कसे माहित असणार? पण माझी आई बोलते कि मी खूप शांत होती…. हेच मी एकदा एका लहान बाळाला हातात घेतल्यावर तिच्या आई ला सांगत होती कि मी पण लहान होती तेव्हा मी खूप शांत होते, इतक्यात जोशी काकू बोलतात… आग कधी तरी खरे बोल, मी तुझा मागे ऐकत आहे तू काय बोलतेस ते.. तू आणि शांत?? बोलून त्या जोरजोरात हसायला लागल्या. ( कारण मी खूप मस्ती करायची म्हणून त्या मला खोडकर म्हणायच्या.). माझा सोसायटी मध्ये मला सगळ्यात भांडकोर आणि मस्तीखोर म्हणून ओळखले जात होते.

आत्ता सगळ्यांना खूप खूप मिस करतेय…….. मामुला विशेष…. खूप गोड आठवणी आहेत सांगायला……. कारण खूप मस्ती, खूप धमाल केली आहे, शांत बसने, सिरीअस राहणे हे गुण माझात नाहीत, म्हणून खूप मजा केली आहे………. मला फिरायला पण खूप आवडते….. पण अगदी लग्न होईपर्यंत मी कधीच जास्त फिरली नव्हती, जास्तीत जास्त गावी, माझे गाव सोलापूर जवळ आहे, तिथे ते पण आई पप्पा बरोबर, फक्त हि १ हौस राहिली होती जी आत्ता जवळ जवळ पूर्ण होत आहे……… मला खूप खूप फिरायचे आहे….. सांगेन तेवढे कमीच…….. पण आत्ता इथेच ब्लॉग संपवते.

Posted in Uncategorized | Leave a comment

सद्गुरू श्री वामनराव पै

आज मला तुम्हाला सद्गुरू श्री वामनराव पै ची ओळख करून द्यायला आवडेल. सद्गुरू श्री वामन राव पै यांचा जन्म, २१ ऑक्टोबर १९२३ ला मध्यम वर्गीय घरात झाला होता. त्यांनी त्यांचे पदवी धारक  १९४४ मध्ये मुंबई युनिवर्सिटी तून पूर्ण केले. सद्गुरू श्री वामन राव पै यांनी आपल्या उरात १ स्वप्न जपले, हे जग सुखी व्हावे आणि हिन्दुस्तान हे राष्ट्र जगात अग्रेसर व्हावे, नुसतेच स्वप्न पाहून ते थांबले नाहीत. त्यांचा चिंतनातून त्यांनी असे तत्वज्ञान उभे केले कि त्यातून अख्ख्या जगाचे चित्र पालटता येईल. जगाचे नंदनवन करू शकणाऱ्या या ज्ञानाला त्यांनी समर्पक नाव दिले, ते म्हणजे “जीवन विद्या”.

जीवनविद्या गरिबांना वरदान,श्रीमंताना आधार व विश्वाला उपयुक्त असून ती धर्मातीत,वैश्विक व शाश्वत आहे. अखिल मानव जातीला जीवनाभिमूख करण्याचे, सुखी करण्याचे प्रचंड सामर्थ्य तिच्यात आहे. बिन खर्चाची,बिन कष्टाची व फ़ावल्या वेळी करता येणारी साधना म्हणजे विश्वप्रार्थना करायला श्री.सदगुरू सांगतात. ही विश्वप्रार्थना म्हणजे शांतीसुखाचा राजमार्ग आहे.

जीवन जगण्याची कला म्हणजे जीवन विद्या. हि विद्या सर्वांनाच मिळावी म्हणून रात्रंदिवस झटून सद्गुरुंनी पुस्तके लिहिलीत, प्रवचने केलीत असे महान कार्य त्यांनी स्वतःची नोकरी आणि संसार उत्तम सांभाळून केले. लोकांनी त्यांना आणि त्यांच्या तत्वज्ञानाला डोक्यावर घेतले. प्रेमाने आणि आदराने सगळे त्यांना सद्गुरू श्री वामन राव पै असे बोलतात. गेलो ५० वर्ष हे कार्य चालू आहे. जीवन विद्येमुळे लोकांचा अंधश्रद्धेवरचा विश्वास उडाला, व्यसने सुटली, स्त्रियांना घरात आणि समाजात मान मिळू लागला, कुटुंब सुखी होऊ लागले, मन-मनात राष्ट्रभक्ती वाढीस लागली. सद्गुरू श्री वामनराव पै यांचा संपर्कात खरोखर जे लोक आलेत त्यांचा जीवनाचे सोनेच झाले.

सदगुरू श्री. वामनराव पै हे दादर व इतर मध्यमवर्गीय विभागात प्रवचने करीत असत तेव्हा त्यांना हा संकल्प स्फ़ुरला की, कामगार विभागात कार्य करावे. कामगार विभागातील तळमळीचे व प्रामाणिक सामाजिक कार्यकर्ते श्री. सहदेवराव कदम यांनी सदगुरूंची प्रवचने आयोजित करण्यात पुढाकार घेतला व त्यांना श्री. वसंतराव मुळे आणि श्री. भास्करराव यादव यांनी सुरेख साथ दिली. या सर्वांच्या सहकार्याने चिंचपोकळी येथील कामगार वेल्फ़ेअर सेंटर येथे श्री. सदगुरूंची प्रवचने सुरू झाली. परंतु ते सेंटर नंतर बंद झाल्यामुळे काळाचौकी येथील हनुमान मंदिरात नियमितपणे प्रवचने करण्यास सुरूवात झाली.त्याचवेळी नाम संप्रदाय मंडळ (जीवन विद्या मिशन) स्थापनेचा संकल्प श्री. सदगुरूंना स्फ़ुरला व तो संकल्प विजयादशमी च्या सुमुहुर्तावर १९५५ साली साकार झाला.त्या दिवशी श्री.सदगुरूंनी जीवनविद्येचा ज्ञानरूपी दीप प्रज्वलित केला.त्या प्रकाशात आज अज्ञान व अंधश्रध्देच्या अंधारात चाचपडणार्‍या लाखो दुःखी जीवांचे जीवन सुख, समाधान व शांती ह्यांनी उजळून निघत आहे. नाम संप्रदाय मंडळ (जीवन विद्या मिशन)ची नोंदणी १९८० साली झाली. कार्याचे नियोजन करण्यासाठी विश्वस्त नेमले गेले. कार्यकारी कार्यकारी मंडळाची निवड करण्यात आली. १९८० साली २५ वर्षे पूर्ण झाली व त्या निमित्त मोठा समाज प्रबोधन महोत्सव आयोजित केला गेला. तसेच २००६ साली जीवनविद्येच्या परिसस्पर्शी क्रांतीला ५० वर्षे पूर्ण झाली म्हणून ६ ते ८ जानेवारीला बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स येथे भव्य दिव्य सुवर्ण महोत्सवी सोहळा साजरा करण्यात आला. त्यांचे काही विचार म्हणजेच सुविचार खालीलप्रमाणे :-

१) या जगात ‘शहाणपण’ हे खरे अमृत होय. आपण दुसरयांना जे सुख किंवा दुःख देतो ते सुख-दुःख आपणाकडे बुमरँग होवून न चुकता परत येते, हा निसर्गाचा अटळ नियम नीट लक्षात घेऊन जीवन जगणे हेच खरे ‘शहाणपण’ होय.

2)  चिंतनाचे खूप महत्व आहे, ते म्हणजे एवढे कि तुम्ही जसे  चिंतन कराल तसे तुम्ही व्हाल. म्हणून कुठलेही क्षेत्र तुम्ही निवडा, त्यात मी पहिला येणारच असेच नेहेमी घट्ट मनात धरून ठेवा. घट्ट धरून ठेवला कि तो विचार हळू हळू आकार घ्यायला लेगतो, म्हणून डॉक्टर मर्फी म्हणतात, कि विचाराकडून सरकत  सरकत आकाराला येणे हा मनाचा स्वभाव आहे. त्यामुळे कोणताही विचारच आपला चांगला असला पाहिजे.
3) तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार.
४) निसर्गनियमांसहित स्वयंचलित, स्वयंनियंत्रित, नैसर्गिक, पद्धतशीर व्यवस्था म्हणजे परमेश्वर. हा परमेश्वर कृपा किंवा कोप करीत नाही तर माणूसच स्वतःच्या कर्मांनी स्वतःवर कृपा किंवा कोप करीतअसतो.
५) स्मरण हा जीवनाचा पाया आहे.जसे स्मरण तसे जीवन असा माणसाचा प्रत्यक्ष अनुभव असतो. याचाच अर्थ असा,स्मरण सुधारले की जीवन सुधारते व स्मरण बिघडले की जीवन बिघडते. सामान्य माणसाचे स्मरण बिघडलेले असते. असे हे बिघडलेले स्मरण सुधारण्याचा साधा व सोपा उपाय म्हणजे देवाचे नामस्मरण करणे हा होय. देवाचे स्मरण हे जीवन असून देवाचे विस्मरण हे मरण होय.
६) जीवनसंगीतातील कुटूंब या दुसर्‍या स्वराचे स्थानही फ़ार महत्वाचे आहे. पत्नी व मुले हे मुले हे कुटूंब संस्थेचे महत्वाचे घटक आहेत हे न लक्षात आल्यामुळे अनेकांचे संसार सुखाच्या नावाने साक्षात तापदायक रखरखीत वाळवंट झाले आहेत. पत्नीचे स्थान हे कुटूंबात अनन्यसाधारण असते व ती अनेक भूमिका अत्यंत कौशल्याने हाताळत असते. घरातील सर्वांची देखभाल करते म्हणून गृहमंत्री, पोटापाण्याची व्यवस्था करते म्हणून अन्न मंत्री, मुलांच्या अभ्यासाकडे-शिक्षणाकडे लक्ष देते म्हणून शिक्षण मंत्री, सर्वांच्या आरोग्याची काळजी घेते म्हणून आरोग्य मंत्री, पतीला योग्य वेळी योग्य सल्ला देऊन साथ देते म्हणून उत्कृष्ट सल्लागार अशा विविध भूमिका ती कुटूंबाच्या छोट्या राज्यात बजावत असते. अशी ही पत्नी कुटूंबरूपी किल्ल्याचा महत्वाचा बुरूज असते. हा बुरूज जर ढासळला तर किल्ला शत्रूच्या हाती सापडून विनाश ओढवला जाऊ शकतो. त्याप्रमाणे कुटूंबरूपी किल्ल्याचा पत्नी हा फ़ार महत्वाचा बुरूज आहे हे लक्षात घेऊन ती सुस्थितीत, सुरक्षित व सुखरूप राहील याची दक्षता घेणे पतीचे कर्तव्य आहे.
७) शुभ चिंतावे, शुभ ईच्छावे, वचनी शुभ बोलावे
शुभ कर्मांच्या सामर्थ्याने करावे जीवनाचे सोने
८) जीवनविद्येच्या तत्वज्ञानाप्रमाणे मूर्तिपूजा ही प्राथमिक स्वरूपातील साधना आहे (ज्याप्रमाणे शाळेत बिगरी इयत्ता- के.जी.असते त्याप्रमाणे). सर्वसामान्य लोकांना देव आकळता येत नाही ही अडचण ओळखून ऋषिमूनींनी लोकांना मूर्तिपूजा करण्यास सांगितले. मूर्तिपूजा करता करता साधकाची स्वस्वरूपाकडे दृष्टी वळेल असा त्यांचा हेतू होता. परंतु मूळ उद्देश राहीला बाजूला व लोक तपशीलातच अडकून पडले. (कर्म-कांड सुरू झाले.) थोडक्यात ज्याप्रमाणे बिगरी हा डिग्रीचा पहिला टप्पा असला तरी कायमचे बिगरीत बसणे शहाणपणाचे नाही, त्याचप्रमाणे कायमचे मूर्तिपूजेत अडकून रहाणे शहाणपणाचे नाही असे जीवनविद्या मानते. मू्र्तीपूजेनंतर खर्‍या देवाची ओळख होण्यासाठी स्वरूप भक्तीकडे वळणे व ती शिकण्यासाठी खर्‍या सदगुरूंना शरण जाणे जीवनविद्या आवश्यक समजते.
९) जीवनविद्या गरिबांना वरदान,श्रीमंताना आधार व विश्वाला उपयुक्त असून ती धर्मातीत,वैश्विक व शाश्वत आहे. अखिल मानव जातीला जीवनाभिमूख करण्याचे, सुखी करण्याचे प्रचंड सामर्थ्य तिच्यात आहे. बिन खर्चाची,बिन कष्टाची व फ़ावल्या वेळी करता येणारी साधना म्हणजे विश्वप्रार्थना करायला श्री.सदगुरू सांगतात. ही विश्वप्रार्थना म्हणजे शांतीसुखाचा राजमार्ग आहे. विश्वप्रार्थना खालीलप्रमाणे :-
हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे,
सर्वांना सुखात, आनंदात,ऐश्वर्यात ठेव,
सर्वांच भल कर, कल्याण कर, रक्षण कर,
आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे
हि प्रार्थना जमेल तेव्हा, जमेल तिथे म्हणावी आणि रात्री झोपताना न चुकता  १०८ वेळा म्हणावी याने तुमच्या जीवनाचे सोने झालेच नाही तर नवल असे सद्गुरू म्हणतात. हा माझा स्वताचा पण अनुभव आहे. आणि तुम्हाला जे पाहिजे ते या प्रार्थनेत शेवटी सर्वांना मिळू दे म्हणून बोला आणि ते तुम्हाला मिळणारच हे माझा अनुभव आहे आणि मला तुम्ही तुम्हचा अनुभव नक्की कळवा.

Posted in Uncategorized | 1 Comment