आज ३१ मार्च २०११, काल आपला पाकिस्तान विरुद्ध वर्ल्ड कप मध्ये सामना झाला. हा समाना म्हणजे किती उत्सुकता असते हे मी कोणाला वेगळे सांगायची गरज नाही असे मला वाटते. सगळ्यांची उत्सुकता बघून असे वाटते कि हा १ सामना नसून १ महायुद्ध आहे आणि  ते आपण जिंकलेच पाहिजे. गेले ३ दिवस जिथे जावे तिथे, सगळ्या बातम्यामध्ये एकच विषय, हा सामना कोण जिंकणार?
त्यात पाकिस्तानचे कर्णधार आफ्रिदीने तर चक्क सांगितले कि आम्ही फक्त सचिनच काय तर कोणत्याही खेळाडूला या म्याच मध्ये शतक करू देणार नाही, आणि सचिनला १०० वे शतक पूर्ण करायला वर्ल्ड कप संपायची वाट बघावी लागेल…… पण अशी अपेक्षा होती कि सचिन याचे उत्तर शतक करूनच देईल. आणि याच टीम मधला आणखी एकजण बोलला, कि असे शतक करून काय फायदा जर तुम्ही म्याच जिंकू शकत नाही????? कारण मागचा म्याच मध्ये सचिनने शतक केले आणि आपण हारलो होतो. पण हे बोलताना हे लोक विसरले होते कि शेवटचा ५ म्याच वर्ल्डकप मधे भारताविरुद्ध यांनी एकही सामना जिंकला नव्हता.
पण भारत विरुद्ध पाकिस्तान बोलले कि प्रत्येकवेळी दडपणाचा मुद्दा समोर येतोच, पण आमच्यावर कधीच दडपण नसते, आमचासाठी सगळ्या म्याच सारख्या असे आपले कर्णधार धोनी म्हणाले, हे बोलून आम्ही म्याच साठी तयार आहोत असे त्याने दाखवले.
काल माझा मित्राने मला संगितले कि, विमानात फक्त हिंदुस्तान पाकिस्तान म्याच हाच विषय होता, एका हवाई सुंदरीने पण त्याला विचारले कि म्याच बघायला चंदिगढला का, आणि तो हो कि नाही बोलायचा आत, त्याचा मागचे जोडपे बोलले कि आम्ही तर दक्षिण आफ्रिके वरून आलो आहोत, वाघ बोर्डर वर नुसती धमाल चालू आहे, रिक्षावाले, हॉटेलवाले, अशा अनेक वाली वाल्यांचे हा दिवस आहे. भारतीय आणि पाकिस्तानी हे जगभरातून आले आहेत, हा उत्साह पहिला कि असे वाटते कि हिंदुस्तान पाकिस्तान हे दोन श्रीमंत देश आहेत, एका म्याचसाठी हि माणसे ३०-४० हजार हसत हसत टाकतात, एवडे टाकून पण यातले किती जण हसत जाणार आणि कितीजण रडत जाणार हे बघायचे होते.
शेवटी हा एक खेळ आहे, पण जो जिता वही सिकंदर. सचिनचा १००व्या शतकावर आफ्रिदी सोडून बाकी सगळे चाहते अपेक्षेने डोळे लावून बसले होते. अंतिम सामन्यापेक्षा सगळ्यात मोठा लढा म्हणून सगळेजण या म्याचकडे डोळे लावून बसले होते, बऱ्याच कंपन्यांनी सुट्टी देण्याचे जाहीर केले होते, कोणी फुल दिवस तर  कोणी हाफ दिवस आणि ज्यांना सुट्टी नव्हती ते पण घरी आले म्याच बघायला कोणी खरे बोलून तर कोणी खोटे बोलून. माझा नवऱ्याने तर सकाळी १ तास लवकर जाऊन दुपारचे जेवण ३.३० ला केले घरी येऊन.
पुण्याच्या मिसळीच्या दुकानात कायम खवचट पुणेरी पाटी पहायला मिळेल, “आमच्याकडे एका मिसळच्या प्लेटमध्ये दोघांनी मिसळ खाण्यास बंदी आहे”
पण केवळ क्रिकेटच्या प्रेमापोटी एका दिवसासाठी ती पाटी खोडून ’एकावर एक फ़्री’ची ऒफ़र होती असे कळले, आणि हि बातमी कळली तेव्हा त्यांचा कडे १००० प्लेट चा ऑर्डर आधीच आल्या होत्या. आणि मुंबई मध्ये काही लोकांनी देव पाण्यात ठेवले होते.कधी देवपूजा नकरणाऱ्यांनी देवळात जाऊन पूजा पाठ केले, कोणी कोणी उपवास केले होते…….. या म्याच साठी कोणी कोणी काय-काय केले हे सांगायचे झाले तर २ पान कमी पडतील. यावरून आपल्याला अंदाज आलाच असेल कि हि म्याच म्हणजे सगळ्याची भावना, प्रेम, अपेक्षा आहेत आपल्या भारतीय टीम कडून. पण याच अपेक्षा त्यांचासाठी ओझे बनतात कधी कधी.
तसे आपली फलंदाजी छान आहे यात काही प्रश्नच नाही,एक आपले कर्णधार सोडले तर सगळेच फलंदाज फॉर्म मध्ये आहेत. आणि आपली गोलंदाजी जरा खराब आहे  म्हणून मला असे वाटत होते कि, आपण जर नाणेफेक जिंकलो तर आपण पहिले गोलंदाजी घ्यावी. पण सागरचा (माझा नवरा) १२.४८ ला फोन आला आणि बोलले कि आपण नाणेफेक जिंकलो आहोत आणि आपली फलंदाजी आहे, तेव्हा मला धोनी चा खूप राग आला…..नंतर विचार केल्यावर आठवले कि पाकिस्तानची गोलंदाजी चांगली आहे म्हणून कदाचित धोनीने  हा निर्णय घेतला असेल. पण शेवटी १ टेन्शन होतेच कि आपली गोलंदाजी खराब म्हणजे त्यांनी म्याच आरामात काढली तर? पण असे वाटले कि रन खूप केले तर मात्र काही होऊ शकते नाहीतर………??????? खूप टेन्शन आले आपली पहिली फलंदाजी ऐकली कि आणि त्यात अजून १ भर म्हणजे नेहेरा ला घेतले असे ऐकले फोन वर मग तर पार डोके फिरले, मी बोली शेवटची म्याच त्याचा मुळे हरलो हे काय कमी होते का??? याला घ्यायची काय गरज होती??????? रागाने हे पण बोलली कि यांना काय शेवटचा ओवर मध्ये म्याच घालवायची इच्छा आहे का????????
आणि म्याच सुरु झाली. सेहवाग ने ३ ऱ्याचा बॉल ला फोर मारली तेव्हा जीव भांड्यात पडला. असे वाटले आत्ता छान खेळतील. पण सेहवाग लगेच आउट झाला आणि गंभीर आला, तो पण जास्त ना खेळता लगेच आउट झाला तरी पण टेन्शन नाही आले कारण युवराज होता ना ज्याने लास्ट ४ म्याच मध्ये सामनावीर चे बक्षिश घेतले होते. आणि सचिन तर होताच. असे वाटले कि युवराज ५० आणि सचिन १०० करूनच राहतील पण तसे झाले नाही. युवराज आल्या आल्या मारायला गेला, त्याची फलंदाजी बघून असे वाटले कि हा आता छक्का मारून ५० रन ची सुरुवात करेल पण हा पट्ट्या तर पहिल्याच बॉल ला आउट होऊन गेला. आणि वर बोलल्या प्रमाणे आपले कर्णधार पण फार काही खेळले नाही. त्यामुळे २०५ ला ६ विकेट गेल्या होत्या, तेव्हा रायना आणि भज्जी खेळत होते, मग मला वाटले कि आज काय आपण २२५ पण नाही करणार बहूतेक. पण रायानाचा आणि गोलंदाजाच्या मदतीने आपण २६० रन केले. पण २६० करून पण जिंकू कि नाही हा प्रश्नच होता कारण आपली गोलंदाजी खूप घाण पहिली होती काही म्याच मध्ये म्हणून खूप टेन्शन आले होते. पण काल आपल्या पट्ट्यांनी गोलंदाजी इतकी सुंदर केली कि त्यांची खरच जाऊन नजर काढावीशी वाटत होती. सगळ्यात जास्त तर त्या नेहेराची, काय वाट लावली होती दक्षिण आफ्रीकेसोबत शेवटचा ओवर मध्ये???? पण खरच काल पाक ला १-१ रन साठी रडवले होते आणि हे पाहून डोळ्यांचे पारणे फिटले, मन धन्य झाले. शेवटी नेहेमी प्रमाणे म्याच टफ झाली, २ ओवर मध्ये ३७ रन पाहिजे होते आणि त्यांच्या  ९ विकेट गेल्या होत्या. शेवटून दुसर्या ओवर मध्ये त्यांनी १ छक्का आणि १ रन काढले. आता शेवटचा ओवर मध्ये ३० रन पाहिजे होते त्यांना जिंकायला. म्हणजे ५ छक्के. बापरे , काही क्षण साठी छाती चा ठोकाच थांबला… मग शेवटचा ओवर मध्ये पहिल्या २ बॉल मध्ये रन काढू शकले नाहीत ते, तेव्हा जीव भांड्यात पडला. मी बोलली चाल आता काय हा ४ बॉल मध्ये ३० रन नाही करणार…. पण १ छक्का मारायला जाऊन १० विकेट गेल्या तर खूप मज्जा येईल असे वाटले मनात, आणि शेवटून दुसऱ्या बॉलला याने छक्का मारायचा प्रयत्न करून १० विकेट गमावल्या तेव्हा खूप खूप आनंद झाला……… अशा प्रकारे आपण म्याच जिंकलो………… खरच काल आपली गोलंदाजी खूप छान झाली…..  नाहीतर हि म्याच जिंकणे खूप अवघड होते….. पण सचिन चे शतक पण पूर्ण झाले नाही या म्याच मध्ये….. अपेक्षा आहे कि फायनल मध्ये तो शतक पूर्ण करेल……. पण त्याने शतक करो किंवा न करो तो आपला कायम आवडता राहणारच आहे यात काही शंका नाही.
शेवटी आमचा टीम ने दाखवले कि आम्हाला वायफळ बडबड करण्यापेक्षा काहीतरी करून दाखवण्यात रस आहे आणि आपला रेकॉर्ड त्यांनी कायम ठेवला. आणि आपण आत्ता फायनलला गेलो आहोत. आणि ती म्याच मुंबई मध्ये आहे…….. अपेक्षा आहे कि ती पण जिंकून यावेळी आपण वर्ल्ड चूप जिंकूच.
सूचना :- यात ब्लॉग मध्ये रन मध्ये किवा विकेट मध्ये काही चूक झाली असेल तर क्षमा करावी……
Advertisements
This entry was posted in Uncategorized. Bookmark the permalink.

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s