आयुष्य सुंदर आहे

आजकाल धावपळीच्या जीवनात आपले आयुष्य किती सुंदर आहे याकडे आपले लक्षच नसते. दररोज दिसणारी गोष्ट म्हणून आपण बऱ्याच गोष्टी बघून न बघितल्यासारख्या करतो जे आपल्याला जवळ असते त्याची किंमत आपल्याला कधीच कळत नाही….. आणि जी वस्तूची/माणसाची  आपल्याला रोजच्या जीवनात सवय होते तेच जेव्हा आपल्यापासून दूर जाते, तेव्हा आपल्याला त्याची किंमत कळते.
जसे कि, आई वडिलांशी आपण रोज बोलतो, कधी वादविवाद होतात, आपण हक्काने किती हट्ट करतो आणि ते आपले सगळे हट्ट पूर्ण करतात… याचा आपण कधी साधा विचार करतो का? कि आज पर्यंत आई पप्पांनी आपल्यासाठी काय काय केले.. नक्कीच नाही. पण आई वडिलांची खरी काय किंमत असते आपल्या आयुष्यात हे एका नुकतेच लग्न होऊन, सासरी राहायला गेलेल्या मुलीला विचारा… तिने जर तुम्हाला सांगायला सुरुवात केली तर मला नाही वाटत कि १-२ दिवसात तुमचे आणि तिचे बोलणे पूर्ण होईल. आई आपल्यासाठी रोज जेवण बनवते… हि किती साधी गोष्ट आहे ना… पण ती पण एक माणूस आहे, तिला पण कधी कंटाळा येतो असे बोलले तर नवरा बोलतो कि तिला कधी कंटाळा आला तर मी तिला हॉटेल मध्ये घेऊन जातो, हॉटेल मध्ये जरी नेले, तरी जेवायला जात असाल. नाष्टा तीच बनवते ना सकाळी..? घरातली साफसफाई कशी होते त्या दिवशी? तुम्ही जर कामाला जात असाल तर असं विचार करा, कि आठवड्यामध्ये तुम्हाला एकच दिवस सुट्टी आहे रविवारी पण ती पण अर्धा दिवस तर तुम्हाला कसे वाटेल? तुम्हाला वाटेल का कि आपल्याला सुट्टी मिळाली म्हणून, तसाच विचार करा कि आईला तिच्या आयुष्यामध्ये कधी आपण पूर्ण दिवस सुट्टी देतो का? कधी तिला बोलतो का कि आज तू आराम कर पूर्ण दिवस, काही काम करू नकोस… म्हणून जमले तर तिला वर्षातून एकदातरी ४-५ दिवसांच्या टूर वर घेऊन जात जा….
नेहेमी आई वडिलांचा विषय निघाला कि सगळे जण आईवरच खूप बोलतात, पण बाबांकडे कोणाचे लक्ष कधीच जात नाही, जे आपल्या वाढदिवसाला न विसरता केक घेऊन येतात, आंब्याचा महिना सुरु झाले कि मुलाला आंबे खूप आवडतात म्हणून आंबे आणतात, आपल्या शाळा, कॉलेजची फी अगदी न विसरता भरतात, त्यांच्या मुळेच आपण एवढे शिकू शकलो हा कधी विचार केलात तुम्ही? नवीन टीव्ही साठी हट्ट केलात, नवीन कॉम्पुटरसाठी हट्ट केलात तर, नवीन मोबाईल, नवीन ड्रेस कशा साठी पण एकदा बाबांना सांगितले तर जमले तर त्याच आठवड्यात, किंवा जितक्या लवकर जमेल तितक्या लवकर, (परिस्थितीनुसार) ते आपला हट्ट पूर्ण करण्याचा प्रयत्न करतात. त्यांना पण आपल्या घरासाठी वेळ देण्याची इच्छा असते, पण त्यांनी घराला वेळ दिला तर आपल्या गरजा कोण पूर्ण करणार? आपण नेहेमी खुश राहावे, आपल्याला उद्या चार-चौघात गेल्यावर कमीपणा किंवा लाज वाटू नये म्हणून नवीन चालीरीती मान्य करून (स्वतःच्या हौशी कमी करून आणि स्वतःच्या पोटाला चिमटा काढून) ते आपले सगळे हट्ट पूर्ण करतात. पण जेव्हा ते रिटायर होतात तेव्हा त्यांना खरी आपली गरज असते.. हे कधीच विसरू नका… कधीतरी तुमच्या धावपळीच्या आयुष्यातून वेळ काढून त्यांना पण वेळ द्या… जेव्हा ते रिटायर होतील तेव्हा त्यांना काही कमी पडू देऊ नका.. त्यांना जास्तीत जास्त खुश ठेवण्याचा प्रयत्न करा. तुम्ही मोठे आणि कमावते झालात म्हणून त्यांना कमी लेखू नका.
तर हे झाले आई वडिलांविषयी, आता आपण बोलू बाकी गोष्टींवर. आता आपण अजून काही नेहेमीच्या वापरत वापर होणाऱ्या  अवयवांबद्दल बोलू.
आपल्याला देवाने दोन हात, पाय दिले आहेत याचे तुम्हाला कधी नवल वाटते का? नक्कीच नाही…… पण त्या हाताची किंमत काय असते ते एका अपंग झालेल्या व्यक्तीला विचारा.. तो तुम्हाला त्याचे महत्व नक्की सांगू शकेल. किंवा असे दृश्य डोळ्यासमोर आणा कि उद्या तुमचे दोन्ही हात तुम्ही एका अपघातात गमावले, तर…? (देव करो असे कोणाबरोबरही नको होऊ देत) तेव्हा जेवताना, लिखाणाची आठवण आली कि, शी-शु ला गेले कि, कधी काही खेळावेसे वाटले कि, कधी समोर काही फुल दिसली कि (स्पर्श करावेसे वाटणे) याची काय किंमत असते ते जाणवेल तुम्हाला. तसेच पायाचे पण आहे. आपल्या शरीरातील प्रत्येक भाग महत्वाचा आहे आणि प्रत्येक भागाचे महत्व आपल्याला तो भाग दुखायला लागला , किंवा त्याला काही इजा झाल्यावरच जाणवते.
आपण सहज बाहेर फिरून आलो आणि कोणी आपल्याला विचारले, कुठे जाऊन आलास? काय पाहिलेस? तर आपण बोलू काही खास नाही, पण तेच तुम्ही एका अश्या व्यक्तीला विचारले जो काही दिवापुर्वी आंधळा होता आणि नुकतेच त्याला दिसायला लागले तर तो सांगेल कि मी बरीच सुंदर सुंदर झाड पहिले, रंगीबेरंगी फुले, सगळ्यांचे चेहऱ्यावरचे भावना, आणि अजून बरेच काही सांगू शकेल, जे कदाचित मी नाही सांगू शकत. आयुष्यात आपण रोज दिसणाऱ्या गोष्टी म्हणून बऱ्याच गोष्टी डोळ्यासमोर असून लक्ष देत नाही. प्रत्येक गोष्ट बारकाईने लक्ष देऊन, सर्व गोष्टींचा आनंद लुटा. एवढी वर्ष शरीराच्या प्रत्येक अवयवाने साथ दिली म्हणून आपण जगण्याचा आनंद लुटू शकलो, त्या शरीराचे आभार माना आणि हात, पाय नीट आहेत तो पर्यंत सगळीकडे फिरून, सगळ्या गोष्टींचा अनुभव घेऊन आनंद लुटण्याचा प्रयत्न करा. आपले जीवन जास्त दिवसाचे नाही म्हणून एखादी गोष्ट म्हातारपणीच करावी म्हणून ठेवू नका, कोणाला माहित म्हातारपण बघण्यासाठी आपण जगू पण कि नाही ते?
तुम्हाला जर एके दिवशी कळाले कि आता फक्त ८ दिवस तुम्ही जगणार आहात, तर ते ८ दिवस तुम्हाला कसे जगायला आवडतील? तसाच रोजचा दिवस जगायला शिका. रोज जमेल तेवढे जास्तीत जास्त आनंदी राहा. आजकाल आपण लहान-लहान गोष्ठीना जास्त महत्व देऊन स्वतःला दुःखाच्या दोऱ्यात अडकवून घेतो.  अशा गोष्ठीकडे दुर्लक्ष करायला शिका, आणि आनंदी राहून या जीवनाची मज्जा घ्या. आयुष्य खरच खूप सुंदर आहे, ते बघायला शिका.
Advertisements
This entry was posted in Uncategorized. Bookmark the permalink.

One Response to आयुष्य सुंदर आहे

  1. Appasaheb Patil says:

    Sundar Lekh Ahe. Lihalya Baddl Dhanywad

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s