जबाबदारी

मला सगळे प्रभा आत्या म्हणतात, माझा नवरा वारून २ महिने झाले तेव्हा पासून मी जोशिकाकांच्या घरी काम करत होती, कारण मला कामाची गरज होती आणि त्यांचा बायकोला क्यान्सरचा त्रास होता. त्यांना २ मूली आणि १ मुलगा होता. १ मुलगी १८ वर्षाची आणि, बाकी दोघे १० आणि १२ वर्षाचे होते. त्यांची बायको क्यान्सरच्या शेवटच्या टप्प्यावर होती आणि डॉक्टरने सांगितले होते कि त्या ३-४ महिन्यापेक्षा जास्त नाही राहणार. आणि ३ महिन्यांनी त्या पण वारल्या. मग त्यांच्या मुलांना मीच जीव लावला, त्यांची काळजी घेतली. सगळे खूप छान चालू होते. जोशी काका नेहेमी म्हणायचे कि “प्रभाताई हे आमचे घर नाही तर १ मंदिर आहे”. आणि खरच त्यांचे घर खूप सुंदर होते, अगदी मंदिरासारखेच पवित्र वाटायचे तिथे. कारण घरात आल्यावर समोर देवीची मोठी मूर्ती होती, खूपच सुंदर आणि रोज तिला ताजातवाना घातलेला हर, तिथे दिवा आणि अगरबत्ती जवळजवळ २४ तास चालू असायची म्हणून घरात आल्या आल्या खूप पवित्र वाटायचे.. ३ वर्ष झाली होती, त्यांच्या मोठ्या मुलीचे कॉलेज पूर्ण झाले होते, आणि ती पुढील शिक्षणासाठी तयारी करत होती, तेव्हाच तिच्या बाबांच्या मित्राने तिच्यासाठी १ स्थळ आणले, मुलाने (अमितने) तिला पसंद केले आणि तिने नापसंद करण्यासारखे मुळात काहीच नव्हते, पण तिला पुढच्या शिक्षणासाठी वाईट वाटले. पण तिची होणारी सासू तिला म्हणाली कि लग्नानंतर तुझे शिक्षण चालू ठेवू शकते, तेव्हा तिला जरा बरे वाटले आणि तिने पण लग्नाला होकार दिला. आम्ही सगळे खूप आनंदी होतो आणि सगळे मिळून तिच्या लग्नाची तयारी करत होतो, जोशी काका खूप जास्तच खुश होते. ते मला बोलले कि आत्ता लग्न एकदाचे उरकून जात नाही तो पर्यंत तुला आणि मला अजिबात आराम नाही मिळणार. त्या दिवशी काकांनी १ मिनिट पण आराम नाही केला, पूर्ण दिवस त्यांची धावपळ चालू होती कारण लग्न २ दिवसावर आले होते, पण जराही कंटाळलेले दिसत नव्हते. काम करताना माझे घड्याळाकडे लक्ष गेले, तेव्हा रात्रीचे १०.३० झाले होते, म्हणून मीच काकांना बोलली, आत्ता आराम करून घ्या, सकाळी लवकर उठून आपण काम करू. म्हणून ते झोपायला गेले.
सकाळी मला घरचे काम आवरून यायला वेळच लागला. मला वाटले जोशी काका रात्री बोलल्याप्रमाणे लवकर उठून कामाला लागले असतील आणि माझी वाट बघून आत्ता पर्यंत त्यांना माझा राग पण आला असेल. पण हे काय, घरात मी गेली तेव्हा सगळीकडे शांतता, मी त्यांच्या मोठ्या मुलीला (मोनिकाला) विचारले, काका कुठे आहेत? मोनिका मला प्रभा आत्या बोलायची. तर ती बोलली कि कदाचित ते उठले नाहीत अजून, काल खूप धावपळीमुळे थकले असतील म्हणून झोप लागली कदाचित त्यांना. मी तिला सांगितले त्यांना उठव, नाहीतर का उठवले नाही त्यांना म्हणून आपल्यालाच ओरडा बसेल, तेव्हा ती त्यांना उठवायला गेली, तिने पप्पा उठा, खूप वेळ झाला….. बोलत, पडदा उघडला, पण काकांचे काहीच उत्तर आले नाही, म्हणून तिने घाबरून मला आवाज दिला, मी पळत गेली, तेव्हा त्यांचे अंग खूप थंड पडले होते, कदाचित हृदयाचा झटका येऊन त्यांचे प्राणपाखरू झोपेतच गेले होते. तिच्या वडिलांच्या शेवटच्या कार्यासाठी तिचे काका, काकु आले होते, ते सगळ्यासमोर तर मुलांशी खूप चांगले वागत होते म्हणून मोनिकाची होणारी सासू तिला बोलली कि काका काकू तुझ्या बहिण भावांची चांगली काळजी घेतील, आपण तुमचे लग्न १५ दिवसानंतर उरकून टाकू. पण तिने तिच्या काका-काकुंचे घरातले वागणे पहिले आणि ती घाबरली, तेव्हाच तिने ठरवले कि आपण या दोघांना काका-काकुकडे सोडायचे नाही, आपण या दोघांना सांभाळायचे. मी तिला बोलली कि पाहिजे तर मी सांभाळेन या दोघांना, तेव्हा ती म्हणाली, कि “प्रभा आत्या, मी फक्त १ मुलगी आहे म्हणून या दोघांना आई बाबा नसताना एकटे सोडून का जाऊ, मला नाही पटत, मी यांना असे वाऱ्यावर टाकणार नाही”. मी तिला विचारले कि तु कसे पार पडणार हे सगळे? असे झाले तर लग्न कधी करणार? ती बोलली लग्नाचे तर माहित नाही, पण आत्ता मी या दोघांना असे सोडून जाणार नाही हे नक्की. हि असे बोलली खरे, पण मला तिची काळजीच वाटत होती. तिने लगेच काका काकुना जायला संगितले, आणि स्वतःने संगीताचा क्लास चालू केला, तो संध्याकाळी घ्यायची आणि दिवसा ती कामाला जाऊ लागली, तिने अगदी बोलाल्याप्रमाणेच सगळे सुरु केले, तेव्हा रविवारी सुट्टीच्या दिवशी अमित घरी आला होता, तिला सहज भेटायला, तेव्हा त्याने लग्नाचा विषय काढला, तिने पण त्याला तेच सांगितले जे मला सांगितले. ती त्याला सरळ बोलली कि तु दुसरे लग्न करू शकतोस. तो बोलला कि मी तुला सोडून कोणाशी लग्न नाही करणार, तुझा होकाराची वाट बघेन, आणि हे फक्त मोनिका, अमित आणि मलाच माहित होते, मोनिका मला बोलली कि हे माझा बहिणीला (राणीला) किंवा भावाला (महेशला) कळू देऊ नका.
तिने खरच बोलल्याप्रमाणे स्वतः मेहनत करून भावा-बहिणीचे शिक्षण पूर्ण केले. एकदा महेश सहज बाहेर गेला होता, तेव्हा त्याला घरी येताना रस्त्यात अमित भेटला. तेव्हा अमितनेच त्याला ओळख दाखवली, आणि कसा आहेस विचारले? तेव्हा तो बोलला, मी बरा आहे, पण तुम्ही एकटेच? तो बोलला हो मी अजून लग्न केले नाही, अजून पण तुझ्या ताईची वाट बघतोय. महेशला हे ऐकून नवलच वाटले कि हा अजून कसा वाट बघतोय? म्हणून तो सरळ अमितला घेऊन घरी गेला, आणि ताईला बोलला कि ताई आत्ता मी मोठा झालो आहे, आता तु आमची काळजी करणे सोड आणि अमितशी लग्न कर. ती बोलली कि आधी तु लग्न कर, या घराला सांभाळणारी घरात येऊ दे, मग मी विचार करेन. मोनिका ला माहित होते कि महेश ला १ मुलगी आवडते, म्हणून तीच त्याला बोलली कि तु तिच्याशी लग्नाविषयी बोल, आपण तुझे लग्न लगेच उरकून टाकू. तेव्हा महेश बोलला, कि ती जरी मला आवडत असली तरी ती खूप श्रीमंत घरातली आहे, म्हणून मला तिच्याशी लग्न नाही करायचे. पण मोनिकाने हट्ट करून हे लग्न लावले.
पण शेवटी महेश बोलला होता तेच खरे झाले. त्याच्या बायकोला त्यांचे घर, त्यांचा परिसर, त्यांचे राहणीमान हे सगळे जुन्या पद्धतीचे वाटू लागले. ती महेशला बोलली पण कि मला ऑफिस कढून १ घर मिळाले आहे, ते खूप छान परिसरात आहे, आपण तिथेच राहायला जाऊया का? पण महेश नको बोलला. नंतर एक आठवडाभर कोणत्या ना कोणत्या गोष्टीवरून घरात रोज भांडण सुरु होते, शेवटी तिने घर सोडून जाण्याचा निर्णय घेतला, जाताना महेशला बोलली कि तु पण घर सोडून येणार असशील तर आपण ऑफिस ने दिलेल्या घरात राहू, आणि येताना मात्र सगळी नाती इथेच कायमची तोडून यायची. त्याने नकार दिला, तिला बोलला तु जाऊ शकतेस, डोके जागेवर आले कि ये घरी. पण मोनिकाने मात्र तिला थांबवले आणि महेशला तिच्यासोबत जा म्हणून सांगितले. महेशची इच्छा नसताना त्याला घर सोडून बायकोबरोबर वेगळे राहावे लागले. महेशला मात्र खूप वाईट वाटले, कारण त्याला मोनिकाची केलेल्या कष्टाची खूप जाणीव होती. आणि आपल्यामुळे ती परत एकटी पडणार याची भीती वाटत होती आणि तिने आपल्यासाठी एवढे कष्ट करून आपण तिला दुखावून एकटे सोडून जाणार याचे वाईट वाटत होते.
तसे मोनिकाने ठरवले होते कि महेशचे लग्न झाले कि आपण अमितबरोबर लग्न करावे, पण आत्ता महेश हे घर सोडून गेल्यामुळे तिच्यावर राणीची जबाबदारी आली होती. तिला तिच्या पुढच्या शिक्षणासाठी परदेशी जायचे होते. म्हणून मोनिकाने कर्ज काढले आणि राणीला परदेशी पाठवायची तयारी केली. योगायोगाने असे कळाले कि ती जिथे शिक्षणासाठी जाणार होती तिथेच यांचे जुन्या ओळखीचे भागवत काका (पाप्पाचे मित्र) राहत होते. मोनिकाने त्यांना फोन करून राणी बद्दल सांगितले, आणि त्यांना राणी आधीपासूनच आवडत होती. ते बोलले कि आम्ही तिची काळजी घेऊ, तू काळजी नको करूस. तेव्हा मोनिका त्यांना म्हणाली कि जमले तर महिन्यातून एकदा तुम्ही राणीला भेटत जा, तिला बरे वाटेल तुम्हाला भेटून. तेव्हा ते काका मोनिकाला बोलले कि राणीला आम्ही आमची सून म्हणून आमच्या घरात कायम राहू दिले तर नाही चालणार का? तेव्हा मोनिकाला गोड आश्चर्याचा धक्का बसला. मोनिका काकांना बोलली कि आधी तुमच्या मुलाने राणीला पसंद तर केले पाहिजे. तेव्हा काका बोलले कि तो माझा शब्दाबाहेर जाणार नाही. आणि तसेच झाले. ते लोक राणीला बघायला दुसऱ्या आठवड्यात आलेच. आणि त्या मुलाने राणीला पसंद पण केले. याच वेळी तिकडे महेशची बायको गरोदर होती आणि रक्षाबंधन पण होते. तेव्हा मोनिकाने  राणीच्या लग्नाचे कळवण्यासाठी महेशला पत्र पाठवले. आणि पत्रासोबत राखीपण पाठवली आणि त्यात हे पण लिहिले होते कि “तुझा बायकोची काळजी घे, तिला त्रास देऊ नकोस. तिला वाईट वाटेल असे काही करू नकोस. आणि आमच्या दोघीकडून हि राखी आहे, ती बांधून घे”. हे पत्र वाचून आणि राखी बघून महेश स्वतःच्या डोळ्यातले पाणी थांबवू शकला नाही, आणि हे सगळे त्याच्या बायकोने पहिले, तेव्हा तिला जाणीव झाली कि महेशला त्याच्या बहिनिपासून दूर करून आपण किती मोठी चूक केली आहे म्हणून. एवढे समजून पण ती महेशला बोलली कि पाहिजे तर तू जाऊ शकतोस लग्नाला, पण मी नाही येणार. तेव्हा महेश बोलला कि ताई ने मला तुझी काळजी घ्यायला सांगितली आहे, आणि ज्या गोष्टीने तुला वाईट वाटेल असे मी काहीच करणार नाही.
तेव्हा लगेच भागवत काकांनी, या दोघांचा साखरपुढा आणि लग्नाची तारीख पण काढली होती. आणि हि तारीख महेशच्या बाळाच्या जन्मानंतरची होती. महेशच्या सासऱ्यांनी त्याच्या बायकोला समजावून राणीच्या लग्नाला महेच्या खुशीसाठी जा म्हणून सांगितले. आणि तिलाही पाप्पाचे बोलणे पटले. आणि तिने पण राणीच्या लग्नाला जायची तयारी केली. हे सगळे महेशला कळाले तेव्हा महेशला खूप खुश झाला, आणि तो जाऊन सरळ अमितला भेटला. त्याने अमित ला सांगितले कि राणीच्या लग्न नंतर मोनिका ताईच्या सगळ्या जबाबदाऱ्या संपतील आणि ती एकटीच राहील, आणि मला तिला एकटे नाही राहू द्यायचे म्हणून माझा असा विचार आहे कि आपण दोन्ही बहिणींची लग्न एकाच दिवशी लावावीत आणि हि कल्पना अमितला पण आवडली. आणि त्याने लग्नाची तयारी सुरु केली. पण हे सगळे फक्त महेश, अमित आणि अमितच्या घरीच माहित होते. अमितच्या घरून लग्नाची जोरदार तयारी सुरु झाली. आणि तिकडे मोनिका आणि राणी मिळून राणीच्या लग्नाची तयारी करत होत्या. महेशने आणि अमितने ठरवले होते कि मोनिकाच्या लग्नाची बातमी तिला कळू द्यायची नाही, आपण तिला १ सुखद धक्का देऊ.
राणीला अशी अपेक्षा होती कि महेश आणि त्याची बायको आपल्या लग्नाला येणार नाहीत. आणि आपल्या लग्ना नंतर तिचे काय होणार याची चिंता पण तिला लागली होती. पण मोनिकाने मात्र महेश या लग्नाला येणार हे गृहीत धरून महेशाला, त्याच्या बायकोला आणि बाळाला पण आहेर आणला होता. आणि तो आहेर घेताना राणी चिडून मोनिकाला बोलली, कि ते नाही येणार आहेत माझा लग्नाला हे मला माहित आहे मग तू का हि खरेदी करतेस? नको करूस हे सगळे ज्याने तुला जास्त त्रास होईल. तरीपण मोनिकाने आपली वेडी आस सोडली नाही. आणि बघता बघता राणीच्या लग्नाचा दिवस जवळ आला. तिच्या लग्नाच्या शेवटच्या दिवशी पण मोनिकाची धावपळ चालूच होती, तेव्हा राणीने न राहवून मोनिकाला विचारलेच कि माझा लग्ना नंतर तू काय करणार? तेव्हा ती बोलली कि मी प्रभा अत्यासोबत राहीन इथेच. हे ऐकून राणीला रडू आवरले नाही आणि ती मोनिकाच्या गळ्यात पडून जोरजोरात रडू लागली.
शेवटी राणीच्या लग्नाचा दिवस उजाडला, त्या दिवशी राणी आणि मोनिका दोघी पण खूप आनंदी होत्या. पण मोनिका राहून राहून सारखे मंडपाच्या दरवाजाकडे बघत होती. याच अपेक्षेने कि महेश येईल. आणि इतक्यात मी महेशला येताना पहिले आणि आत जाऊन मोनिकाला सांगितले, मोनिका हसत हसत हातातले काम सोडून धावत बाहेर आली, आणि बघते तर काय, महेश एकटा आला नव्हता आणि सोबत बायकोला, बाळाला आणि अमितला हेऊन आला. अमित ला बघून मोनिकाला काहीच कळत नव्हते, तेव्हा महेश पुढे येऊन मोनिकाचा हात पकडून बोलला कि आत्ता तुझ्या सगळ्या जबाबदाऱ्या संपल्या, आणि आज मी राणीसोबत तुझे पण लग्न लावणार आहे. हे ऐकून मोनिकाला खरच आनंद आणि आश्चर्य वाटले आणि तिने डोळ्यातले पाणी पुसत हसून महेशाला घट्ट मिठी मारली. तेव्हाच महेशच्या बायकोने पण मोनिकाची माफी मागितली. आणि महेशने ठरविल्याप्रमाणे राणीबरोबर मोनिकाचे पण लग्न लावले. आणि माझी पोरगी सुटली एकदाची सगळ्या जबाबदारीतून. मला खरच त्या पोरीचा खूप हेवा वाटतो, तिचे किती कौतुक करावे ते कमीच आहे. आजच्या युगात कोणती बहिण आपल्या बहिण भावासाठी एवढा त्याग करेल? देव करो अशी वेळ कोणावर पण नको येऊ देत, पण असे जीव लावणारे बहिण भाऊ मात्र सगळ्यांना मिळू देत.
Advertisements
This entry was posted in Uncategorized. Bookmark the permalink.

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s