मुंबई ते दुबई

माझं लग्न झाले, आणि काही दिवसातच परदेशात जाण्याचा योग आला. आता काही दिवसात परदेशात जाणार हे कळले तेव्हा माझे पाय जमिनीवर नव्हते. पण हा आनंद सांगणार तरी कोणाला? म्हणून कोणाला काहीच बोलली नाही. पण मनातल्या मनात खूप खुश होते मी. मला लहानपणापासून इच्छा होती कि आयुष्यात एकदा तरी मी परेदेशात फिरून यावे. पण आत्ता जाणार ते लग्न झाल्या झाल्या, म्हणून जेवढी ख़ुशी तेवढीच भीती पण वाटत होती, कि नवरा इथे आल्यावर लगेच कामाला जाणार होता, मग मला करमेल का घरी? मी काय करेन दिवसभर? एकतर अनोळखी शहर. तसे आम्ही दोघेच नव्हतो येणार परदेशात, माझा सासूबाई पण येणार होत्या, पण शेवटी या पण नवीन माझासाठी आणि मी पण नवीन त्यांच्या साठी, म्हणून खूप कसेतरी वाटत होते.
मी लग्न झाल्यावर खूप खुश होते परदेशात लवकरच जाणार म्हणून, पण जसा जसा परदेशात जायचा दिवस जवळ येत होता तसे जास्त काळजी वाटत होती, मी ठरवले होते कि मी जायच्या अधि रडणार नाही. परेदेशात जायच्या आधी, जमेल तेवढ्या सगळ्या मैत्रिणींना भेटून घेतले, सगळ्यांना फोन केले, सगळ्यांशी बोलून खूप बरे वाटले, पण जेव्हा आई पप्पा ना भेटायला म्हणून घरी जावून आली तेव्हा धरून ठेवलेला बांध सुटला आणि निघताना मात्र पप्पाना मिठी मारून खूप रडली, जसे जसे विमानतळ जवळ येत होते तेव्हा पण रडणार नाही ठरवले, पण शेवटी आई पप्पा ना आत्ता कधी बघू शकेन हा विचार डोक्यात आला आणि रडू आवरू शकले नाही.
शुक्रवारी विमानानं ‘टेक ऑफ’ केला आणि शनिवारी सकाळी २.३० ला आम्ही दुबईला पोहोचलो. रविवार पासून नवऱ्याने ऑफिस जॉईन केले. मला मात्र अजिबात करमत नव्हते. काय करू कळत नव्हते, पण माझं नशिबाने माझी सासू चांगली निघाली, आम्ही दोघी खूप गप्पा मारायचो, नंतर मला माझं नशिबाने मराठी ब्लॉग मिळाला, नंतर नेट वरच मराठी कादंबऱ्या मिळाल्या, त्यामुळे वाचनात आणि गप्पा मध्ये दिवस कसा निघून जायचा ते कळत नव्हते. आणि आई पप्पा बरोबर विडीओ चत करायला मिळायचे, म्हणून रोज त्यांना बघून बोलू शकत होती म्हणून करमत होते.  पण शेवटी थोडावेळ पण एकटी असली कि लगेच मैत्रिणींची आठवण येते, आई पाप्पाची, दादाची आठवण येते. इथे कोणालाच भेटू शकत नाही म्हणून खूप कसे तरी वाटते. मला इथे येऊन आता ३ महिने होतील, या ३ महिन्यात मी बऱ्याच ठिकाणी फिरले, तरी नवऱ्याला शुक्रवार, शनिवार सुट्टी असते, आणि शुक्रवारी सकाळी त्याच्या कंपनीची म्याच असते, तिथे पण आम्ही मिळून जातो… आम्ही हे २ दिवस जमेल तेवढे जास्त एन्जोय करून घेतो. खूप मज्जा येते आता, पण शेवटी आपला देश (भारत) तो आपला देश, भले किती पण घाण असो, किती पण गर्दी असो आणि आपली माणसे किती पण त्रास देणारी असो, पण या सगळ्यापासून जेव्हा दूर राहतो ना, तेव्हा त्यांचे महत्व आपल्याला जास्त जाणवते हे खरे आहे.
मी इथे आल्यावर, जगभरातली सगळ्यात उंच इमारत (बुर्ज खलिफा) पहिली, डॉल्फिन शो पहिला, बरेच प्राणी संघ्रहालय पहिले आहेत, त्यात बरेच प्राणी मी माझा आयुष्यात पहिल्यांदा इतक्या जवळून पहिले आहेत. दुबई मध्ये जवळ जवळ आर्धे तर भारतीय लोक राहतात. इथे काही गोष्टी माझा निदर्शनास आल्या, त्या म्हणजे १) तेच भारतीय लोक जे भारतात असताना कुठे पण कचरा टाकतात, तेच इथे नाही चालत म्हणून फक्त कचरा कुंडीतच कचरा टाकतात. २) मुंबई सारख्या ठिकाणी, बऱ्याच वेळा, पुरुष (रेल्वे मध्ये, बस मध्ये) सीट वर बसलेले असतात, आणि बायका उभ्या असतात, तेच पुरुष इथे बायकांना बसायला जागा देण्यासाठी बसलेले उठतात. इथल्या बायकांना मान देतात. ३) चालत्या गाडी समोरून कोणी चालत जात असेल तर गाडी चा स्पीड कमी करून आधी चालणाऱ्या लोकांना (मान देऊन) जाऊ देतात, भले मग त्यांना किती पण घाई असो. ४) आमच्या घराजवळ एक बाग आहे, तसे दुबई म्हणजे एक वाळवंट, पण इथे त्या बागेत सगळीकडे हिरवी झाडे बघायला मिळतात, आणि रस्त्यावर पण दोन्ही बाजूला पूर्ण हिरवळ असते… नेहेमी वेगवेगळ्या रंगाची फुले लावलेली असतात फुटपाथच्या बाजूला…इथे पाणी विकत आणून पितो आम्ही, पण झाडे आणि त्यांची हिरवळ इथे खूप चांगल्या पद्धतीने जपली आहेत…. आणि हि सगळी कामे जोपासणारी लोक आहेत “भारतीय”…..  अगदी टीव्ही सीरिअल मध्ये बघतो तसेच आहे सगळे इथे….    अजून बऱ्याच गोष्टी आहेत अशा सुंदर आणि सांगण्यासारख्या….. मला असे मनात येऊन गेले कि आपल्या याच लोकांनी याच गोष्टी भारतात केल्या, तर भारत सुधारायला आणि सुंदर व्हायला जास्त वेळ नाही लागणार. हेच मी माझ्या नवऱ्याला पण सांगितले, तर त्याने काय बोलावे, तो बोलला कि प्रत्येक जण आपल्या घरी मस्ती करतोच कि, पण जेव्हा आपण दुसऱ्यांच्या घरी जातो तेव्हा किती छान वागतो, शांत राहतो, हे अगदी तसेच आहे. मला पण पटले, पण खरच आपल्या स्वतःच्या देशात पण सगळे असेच वागलो तर आपला भारत देश सुंदर व्हायला जास्त वेळ नाही लागणार.
Advertisements
This entry was posted in Uncategorized. Bookmark the permalink.

2 Responses to मुंबई ते दुबई

  1. Anu says:

    mast aahe………

  2. Appasaheb Patil says:

    chhan ahe

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s