अंधश्रद्धा

तुमचा राशीभविश्यावर विश्वास आहे का? माझा तरी नाही, जुन्याकाळात सांगितलेले भविष्य खरे ठरायचे कारण तेव्हाचे लोक तेवढा खोल अभ्यास करायचे, त्यांना खरच तेवढे ज्ञान होते.पण आजकाल सगळेजण भविष्य संगाण्य्साठी जन्मदिवस आणि वेळ विचारतात आणि एका पुस्तकात बघून भविष्य सांगतात. आता मला तुम्हीच सांगा, एक दिवसात एकच वेळी जगात किती जण जन्माला येत असतील? किंवा एका राशीत कितीजण मोडत असतील. म्हणून त्या सगळ्यांचे नशीब किवा भविष्य काय एकच असेल काय?

आजकाल तर चक्क लग्न जमवण्यासाठी पत्रिका पाहायचे खूळ डोक्यातआहे भरपूर लोकांचा,आणि अजून पण त्यावर विश्वास ठेवतात कसे हे मोठे नवलआहे. तसे हे खूळ बरच जुने आहे आणि ते परंपरेनुसार आत्ता पण बघतात. पण परत तोच प्रश्न, पत्रिका जुळवतात हि पुस्तके बघून, आणि एकच पुस्तकातून ४ जण गुण जुळवतात म्हणून गुण जरी सारखे निघाले तरी भविष्य सांगताना मात्र ४जण वेगवेगळे सांगतात,हे कसे शक्यआहे हे अजून मला कळले नाही. तुम्हाला काळे असेल तर मला नक्की सांगा. हा माझा वैयक्तिक अनुभव आहे म्हणून विचारले. पण शेवटी एकाचे पण खरे होत नाही. एवढे कळूनपण आमचा कडे रोज पेपर वाचतात ते भविष्य बघण्यासाठी.

आज काल सगळ्यांनी भविष्य बघणे हा एक व्यवसाय बनवलाआहे, भविष्य सांगून पैसे घेतात खरे पण खरं काहीच होत नाही, माझा घराजवळ १ भडजी राहतो, त्याने भविष्य सांगून एवढा पैसा कमावलाआहे कि त्याने मुंबई मध्ये नवीन घर घेतले.ते पण२ बेडरूमचे, आज मुंबई मध्ये घर घेणे ते पण२ बेडरूमचे  किती महाग आहे हे मी तुम्हाला सांगायला नकोच. यापेक्षा अजून चांगले उदाहरण काय असेल? हे झाले पैसे कमवणे,आणि त्यांचा कडे माझी मैत्रीण दर ६ महिन्यांनी फेऱ्या मारते, तो तिला सांगतो कि पुढचा ६ महिन्यात तुझे लग्न होईल, असे ४ वर्ष निघून गेली पण अजून तिचे लग्न झालेच नाही. आणि लग्न होत नाही म्हणून तिच्या कढून दरवर्षी ३-४ हजाराची पूजा करून घेतो, तरीपण ती कशी विश्वास ठेवते हेच नवल,ते पण या युगात.आणि लग्न जमन्यासाठी, सुखी राहण्यासाठी भडजीची गरज कशालाआहे हेच मला कळत नाही. तुम्हाला कळत असेल तर मला नक्की कळवा .

मला तुम्हाला सांगायला आवडेल कि माझा पाप्पाचे एक मित्र आहेत, त्यांनी प्रेम-विवाह केला आहे म्हणून त्यांनी पत्रिका पहिलीच नाही,पण  त्यांच्या बायकोने लग्ना नंतर पत्रिका पहिली, तेव्हा त्यांना सांगितले कि तुमचे १२.५० गुण जुळत आहेत, आणि तुमची नाड एक आहे, त्यामुळे तुम्हाला मुल होणे शक्य नाही, आणि झालेतर अपंग होईल,आणि तुम्ही कधीच सुखी राहणार नाही. आज त्यांचा लग्नाला ३२ वर्ष झाली, त्यांना १ मुलगा आणि २ मूलीआहेत, मुलगा इंजिनीअर आहे आणि ५०-६० हजाराची नोकरी आहे त्याला सुरुवातीला. १ मुलीचे लग्न होऊन ती जर्मनीमध्ये सेटल झालीआहे, आणि दुसरीचे लग्न होऊन ती घरातच आहे कारण तिला नोकरीची गरजच नाही, ती पण लाखात खेळते. आणि या नवरा बायकोने नोकरीकरून एवढा पैसा कमावला आहे कि ते आता दरवर्षी मुलीकडे म्हणजे जर्मनीला जाऊन अजून १ बाहेरगावी टुर करतात. आता मला सांगा हे सुखी नाहीत का? यांची मुलं कशीआहेत?? आणि त्या भडजीने काय सांगितले होते? यावरून एकच कळते कि आजकाल भविष्य सांगणे हा फक्त एक व्यवसाय झाला आहे, कोणाचे काही खरे होत नाही, कोणाचा तेवढा खोल अभ्यास नाही. आणि लग्न करण्यासाठी मुलामुलीने एकमेकांना पसंद केले आणि घरून होकार असले म्हण्जे झाले त्यासाठी भडजीची काय गरज? आणि सुखी राहण्यसाठी तुम्ही इतरांना सुखी ठेवा,तुम्ही आपोआप सुखी होणारच हा निसर्गाचा अटळ नियम आहे.
तुम्ही कोणती पण गोष्ट खूप जिद्दीने आणि मन लावून केली तर तुम्ही तुम्हाला जे पाहिजे ते मिळवू शकता…. फरक इतकाच कि काही गोष्टी लगेच मिळतात तर काही उशिरा….. आणि यासाठी तुम्हाला जिद्दीची आणि तुमची जोरदार इछेची गरज आहे, भडजी ची गरज नाही. तुमचे नशीब घडवणे तुमच्या हातात आहे, भडजीच्या नाही. म्हणून सद्गुरू श्री वामनराव पै म्हणतात, “तूच आहेस तुझा जीवनाचा शिल्पकार.”


Advertisements
This entry was posted in Uncategorized. Bookmark the permalink.

One Response to अंधश्रद्धा

  1. Appa ramkrishna Parab says:

    तुमचे विचार खूप आवडले.तूच आहेस तुझा जीवनाचा शिल्पकार.”हे सगळ्यांणा कळवावे

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s