सद्गुरू श्री वामनराव पै

आज मला तुम्हाला सद्गुरू श्री वामनराव पै ची ओळख करून द्यायला आवडेल. सद्गुरू श्री वामन राव पै यांचा जन्म, २१ ऑक्टोबर १९२३ ला मध्यम वर्गीय घरात झाला होता. त्यांनी त्यांचे पदवी धारक  १९४४ मध्ये मुंबई युनिवर्सिटी तून पूर्ण केले. सद्गुरू श्री वामन राव पै यांनी आपल्या उरात १ स्वप्न जपले, हे जग सुखी व्हावे आणि हिन्दुस्तान हे राष्ट्र जगात अग्रेसर व्हावे, नुसतेच स्वप्न पाहून ते थांबले नाहीत. त्यांचा चिंतनातून त्यांनी असे तत्वज्ञान उभे केले कि त्यातून अख्ख्या जगाचे चित्र पालटता येईल. जगाचे नंदनवन करू शकणाऱ्या या ज्ञानाला त्यांनी समर्पक नाव दिले, ते म्हणजे “जीवन विद्या”.

जीवनविद्या गरिबांना वरदान,श्रीमंताना आधार व विश्वाला उपयुक्त असून ती धर्मातीत,वैश्विक व शाश्वत आहे. अखिल मानव जातीला जीवनाभिमूख करण्याचे, सुखी करण्याचे प्रचंड सामर्थ्य तिच्यात आहे. बिन खर्चाची,बिन कष्टाची व फ़ावल्या वेळी करता येणारी साधना म्हणजे विश्वप्रार्थना करायला श्री.सदगुरू सांगतात. ही विश्वप्रार्थना म्हणजे शांतीसुखाचा राजमार्ग आहे.

जीवन जगण्याची कला म्हणजे जीवन विद्या. हि विद्या सर्वांनाच मिळावी म्हणून रात्रंदिवस झटून सद्गुरुंनी पुस्तके लिहिलीत, प्रवचने केलीत असे महान कार्य त्यांनी स्वतःची नोकरी आणि संसार उत्तम सांभाळून केले. लोकांनी त्यांना आणि त्यांच्या तत्वज्ञानाला डोक्यावर घेतले. प्रेमाने आणि आदराने सगळे त्यांना सद्गुरू श्री वामन राव पै असे बोलतात. गेलो ५० वर्ष हे कार्य चालू आहे. जीवन विद्येमुळे लोकांचा अंधश्रद्धेवरचा विश्वास उडाला, व्यसने सुटली, स्त्रियांना घरात आणि समाजात मान मिळू लागला, कुटुंब सुखी होऊ लागले, मन-मनात राष्ट्रभक्ती वाढीस लागली. सद्गुरू श्री वामनराव पै यांचा संपर्कात खरोखर जे लोक आलेत त्यांचा जीवनाचे सोनेच झाले.

सदगुरू श्री. वामनराव पै हे दादर व इतर मध्यमवर्गीय विभागात प्रवचने करीत असत तेव्हा त्यांना हा संकल्प स्फ़ुरला की, कामगार विभागात कार्य करावे. कामगार विभागातील तळमळीचे व प्रामाणिक सामाजिक कार्यकर्ते श्री. सहदेवराव कदम यांनी सदगुरूंची प्रवचने आयोजित करण्यात पुढाकार घेतला व त्यांना श्री. वसंतराव मुळे आणि श्री. भास्करराव यादव यांनी सुरेख साथ दिली. या सर्वांच्या सहकार्याने चिंचपोकळी येथील कामगार वेल्फ़ेअर सेंटर येथे श्री. सदगुरूंची प्रवचने सुरू झाली. परंतु ते सेंटर नंतर बंद झाल्यामुळे काळाचौकी येथील हनुमान मंदिरात नियमितपणे प्रवचने करण्यास सुरूवात झाली.त्याचवेळी नाम संप्रदाय मंडळ (जीवन विद्या मिशन) स्थापनेचा संकल्प श्री. सदगुरूंना स्फ़ुरला व तो संकल्प विजयादशमी च्या सुमुहुर्तावर १९५५ साली साकार झाला.त्या दिवशी श्री.सदगुरूंनी जीवनविद्येचा ज्ञानरूपी दीप प्रज्वलित केला.त्या प्रकाशात आज अज्ञान व अंधश्रध्देच्या अंधारात चाचपडणार्‍या लाखो दुःखी जीवांचे जीवन सुख, समाधान व शांती ह्यांनी उजळून निघत आहे. नाम संप्रदाय मंडळ (जीवन विद्या मिशन)ची नोंदणी १९८० साली झाली. कार्याचे नियोजन करण्यासाठी विश्वस्त नेमले गेले. कार्यकारी कार्यकारी मंडळाची निवड करण्यात आली. १९८० साली २५ वर्षे पूर्ण झाली व त्या निमित्त मोठा समाज प्रबोधन महोत्सव आयोजित केला गेला. तसेच २००६ साली जीवनविद्येच्या परिसस्पर्शी क्रांतीला ५० वर्षे पूर्ण झाली म्हणून ६ ते ८ जानेवारीला बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स येथे भव्य दिव्य सुवर्ण महोत्सवी सोहळा साजरा करण्यात आला. त्यांचे काही विचार म्हणजेच सुविचार खालीलप्रमाणे :-

१) या जगात ‘शहाणपण’ हे खरे अमृत होय. आपण दुसरयांना जे सुख किंवा दुःख देतो ते सुख-दुःख आपणाकडे बुमरँग होवून न चुकता परत येते, हा निसर्गाचा अटळ नियम नीट लक्षात घेऊन जीवन जगणे हेच खरे ‘शहाणपण’ होय.

2)  चिंतनाचे खूप महत्व आहे, ते म्हणजे एवढे कि तुम्ही जसे  चिंतन कराल तसे तुम्ही व्हाल. म्हणून कुठलेही क्षेत्र तुम्ही निवडा, त्यात मी पहिला येणारच असेच नेहेमी घट्ट मनात धरून ठेवा. घट्ट धरून ठेवला कि तो विचार हळू हळू आकार घ्यायला लेगतो, म्हणून डॉक्टर मर्फी म्हणतात, कि विचाराकडून सरकत  सरकत आकाराला येणे हा मनाचा स्वभाव आहे. त्यामुळे कोणताही विचारच आपला चांगला असला पाहिजे.
3) तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार.
४) निसर्गनियमांसहित स्वयंचलित, स्वयंनियंत्रित, नैसर्गिक, पद्धतशीर व्यवस्था म्हणजे परमेश्वर. हा परमेश्वर कृपा किंवा कोप करीत नाही तर माणूसच स्वतःच्या कर्मांनी स्वतःवर कृपा किंवा कोप करीतअसतो.
५) स्मरण हा जीवनाचा पाया आहे.जसे स्मरण तसे जीवन असा माणसाचा प्रत्यक्ष अनुभव असतो. याचाच अर्थ असा,स्मरण सुधारले की जीवन सुधारते व स्मरण बिघडले की जीवन बिघडते. सामान्य माणसाचे स्मरण बिघडलेले असते. असे हे बिघडलेले स्मरण सुधारण्याचा साधा व सोपा उपाय म्हणजे देवाचे नामस्मरण करणे हा होय. देवाचे स्मरण हे जीवन असून देवाचे विस्मरण हे मरण होय.
६) जीवनसंगीतातील कुटूंब या दुसर्‍या स्वराचे स्थानही फ़ार महत्वाचे आहे. पत्नी व मुले हे मुले हे कुटूंब संस्थेचे महत्वाचे घटक आहेत हे न लक्षात आल्यामुळे अनेकांचे संसार सुखाच्या नावाने साक्षात तापदायक रखरखीत वाळवंट झाले आहेत. पत्नीचे स्थान हे कुटूंबात अनन्यसाधारण असते व ती अनेक भूमिका अत्यंत कौशल्याने हाताळत असते. घरातील सर्वांची देखभाल करते म्हणून गृहमंत्री, पोटापाण्याची व्यवस्था करते म्हणून अन्न मंत्री, मुलांच्या अभ्यासाकडे-शिक्षणाकडे लक्ष देते म्हणून शिक्षण मंत्री, सर्वांच्या आरोग्याची काळजी घेते म्हणून आरोग्य मंत्री, पतीला योग्य वेळी योग्य सल्ला देऊन साथ देते म्हणून उत्कृष्ट सल्लागार अशा विविध भूमिका ती कुटूंबाच्या छोट्या राज्यात बजावत असते. अशी ही पत्नी कुटूंबरूपी किल्ल्याचा महत्वाचा बुरूज असते. हा बुरूज जर ढासळला तर किल्ला शत्रूच्या हाती सापडून विनाश ओढवला जाऊ शकतो. त्याप्रमाणे कुटूंबरूपी किल्ल्याचा पत्नी हा फ़ार महत्वाचा बुरूज आहे हे लक्षात घेऊन ती सुस्थितीत, सुरक्षित व सुखरूप राहील याची दक्षता घेणे पतीचे कर्तव्य आहे.
७) शुभ चिंतावे, शुभ ईच्छावे, वचनी शुभ बोलावे
शुभ कर्मांच्या सामर्थ्याने करावे जीवनाचे सोने
८) जीवनविद्येच्या तत्वज्ञानाप्रमाणे मूर्तिपूजा ही प्राथमिक स्वरूपातील साधना आहे (ज्याप्रमाणे शाळेत बिगरी इयत्ता- के.जी.असते त्याप्रमाणे). सर्वसामान्य लोकांना देव आकळता येत नाही ही अडचण ओळखून ऋषिमूनींनी लोकांना मूर्तिपूजा करण्यास सांगितले. मूर्तिपूजा करता करता साधकाची स्वस्वरूपाकडे दृष्टी वळेल असा त्यांचा हेतू होता. परंतु मूळ उद्देश राहीला बाजूला व लोक तपशीलातच अडकून पडले. (कर्म-कांड सुरू झाले.) थोडक्यात ज्याप्रमाणे बिगरी हा डिग्रीचा पहिला टप्पा असला तरी कायमचे बिगरीत बसणे शहाणपणाचे नाही, त्याचप्रमाणे कायमचे मूर्तिपूजेत अडकून रहाणे शहाणपणाचे नाही असे जीवनविद्या मानते. मू्र्तीपूजेनंतर खर्‍या देवाची ओळख होण्यासाठी स्वरूप भक्तीकडे वळणे व ती शिकण्यासाठी खर्‍या सदगुरूंना शरण जाणे जीवनविद्या आवश्यक समजते.
९) जीवनविद्या गरिबांना वरदान,श्रीमंताना आधार व विश्वाला उपयुक्त असून ती धर्मातीत,वैश्विक व शाश्वत आहे. अखिल मानव जातीला जीवनाभिमूख करण्याचे, सुखी करण्याचे प्रचंड सामर्थ्य तिच्यात आहे. बिन खर्चाची,बिन कष्टाची व फ़ावल्या वेळी करता येणारी साधना म्हणजे विश्वप्रार्थना करायला श्री.सदगुरू सांगतात. ही विश्वप्रार्थना म्हणजे शांतीसुखाचा राजमार्ग आहे. विश्वप्रार्थना खालीलप्रमाणे :-
हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे,
सर्वांना सुखात, आनंदात,ऐश्वर्यात ठेव,
सर्वांच भल कर, कल्याण कर, रक्षण कर,
आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे
हि प्रार्थना जमेल तेव्हा, जमेल तिथे म्हणावी आणि रात्री झोपताना न चुकता  १०८ वेळा म्हणावी याने तुमच्या जीवनाचे सोने झालेच नाही तर नवल असे सद्गुरू म्हणतात. हा माझा स्वताचा पण अनुभव आहे. आणि तुम्हाला जे पाहिजे ते या प्रार्थनेत शेवटी सर्वांना मिळू दे म्हणून बोला आणि ते तुम्हाला मिळणारच हे माझा अनुभव आहे आणि मला तुम्ही तुम्हचा अनुभव नक्की कळवा.

Advertisements
This entry was posted in Uncategorized. Bookmark the permalink.

One Response to सद्गुरू श्री वामनराव पै

  1. Meena Gurav says:

    khup chan lihilay…

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s