मानवी स्वभाव

आजकाल सगळेच किती शुल्लक झाले आहे ना????? इतके दिवस टीव्ही वर एकच बातमी होती, जपानचा भूकंप…….. हे ऐकून प्रत्येकालाच खूप वाईट वाटले….., त्यात कित्येकजण जखमी पावले, किती लोक मरण पावले याचा तर अंदाजच नाही….. या बातम्या ऐकताच सगळे हादरले, ज्यांचे ज्यांचे नातेवाईक जपानला होते त्यांनी, त्यांना फोन करून नीट असल्याची खात्री करून घेतली. रोज त्या बातम्या बघून टेन्शन वाढत होते. आणि पाण्यात आणि हवेत तर किरणोत्सराचे प्रमाण वाढले होते. आणि हे सगळे अजून पण चालूच आहे…. पण आत्ता आम्ही त्याचा विचार पण नाही करत…. कारण म्हणजे वर्ल्ड कप मधली पाकिस्तान सोबत म्याच जिंकल्याचा आनंद, अंतिम सामन्याला पोहोचल्याचा आनंद, आणि शेवटी वर्ल्ड कप जिंकल्याचा आनंद. या सर्व आनंदामध्ये आम्ही जपानला विसरूनच गेलोत. हा मानवी स्वभावाक आहे मुळी…. सगळे असते ते काही क्षणासाठी, फक्त राग असतो तो आयुष्यभरासाठी….. त्या रागाला मात्र सगळेजण अगदी फ्रीजमध्ये ठेवल्या सारखे ठेवतात सांभाळून. त्याला कधीच विसरत नाही. भांडण, राग हे तर आपल्या आयुष्यात चालूच असते. पण त्याला पण कधीतरी आनंदाच्या क्षणी विसरून परत अधिसारखे नाती जुळवून चांगले होऊन राहायचे असते, पण असे कुठेच बघायला मिळत नाही.

जन्माला येताना काय घेऊन येतात आणि मरण पावल्यावर काय घेऊन जातात???? कशावरून भांडणे करतात, तर जमीन, मालमत्ता, घर, अरे पण हे नीट बोलून गोडीने पण करता येतात, यासाठी जन्मभर नाती का तोडायची???? या भांडनासमोर त्यांना नाती पण अगदी शुल्लक वाटतात. रागापुढे लहान मोठे कोणीच दिसत नाही, अगदी तो माणूस मेला तरी त्याला बघायला पण येत नाही, एवढा पण असतो राग कि कोणी मेले तरी तोंड न बघण्याएवढा ????? अगदी मग ती जन्म देणाऱ्या आई इतकी कधी काळी आपल्याला प्रेमळ होती हे पण नाही आठवत त्या रागापुढे. माझे मलाच नवल वाटते मी इतका वाईट कसा वागू शकतो?? आज मात्र खूप वय झाले आहे, आज आपल्याला बोलायला बघायला कोणी जवळ नाही, खूप वाईट वाटते, पण सांगणार कोणाला, सगळे तर मीच घालवले माझा रागाने, हट्टाने…. आत्ता खूप आठवण येते सगळ्यांची, किती छान छान मूली होत्या त्या, माझा माऊ बरोबर खेळायच्या, एकत्र शाळेत जायच्या, मी त्यांचा अभ्यास घ्यायचो, कसे विसरलो मी हे सगळे सोनेरी क्षण रागात माझे मलाच कळत नाही. अगदी माझा रागामुळे त्या मुलींना एकमेकींच्या लग्नाला पण जाता आले नाही, काय वाटले असेल त्यांना आज विचार केला तर खूप वाईट वाटते, पण आत्ता वाईट वाटून काय फायदा? लग्न एकदाच होते, फक्त माझा रागामुळे त्यांनी एकमेकींची लग्न नाही पहिली. क्षमापण मागू शकत नाही, कारण बोलून कमीपणा घेऊ वाटत नाही. पन अत्ता मी त्यांची माफी मगीतली तरी मला माफ करतील का त्या महित नाही. पण जायचा आधी जमले तर एकदा माफी मागेन त्यांची. म्हणतात कि झालेल्या चुका माफ करणारा मोठा असतो, आणि माझा माउचे मन पण तेवढे मोठे आहे, म्हणून कदाचित ती मला माफ करेल अशी अपेक्षा आहे. मग मी मरायला मोकळा.

आत्ता जीवाचे काही वाटत नाही, कारण आयुष्यात मला जे करायचे होते ते मी केले सगळे, एक आईच होती, तिला पण खूप बोललो, पण शेवटी ती आईच ना, आपल्या मुलावर रागावणार तरी कशी???? आणि तिला तरी कोण होते माझा शिवाय? आत्ता आई पण नाही, एक मुलगी आणि बायकोच आहे, पण मुलगी आत्ता तिचा संसारात आणि बायकोला माझासाठी वेळ कुठे? पण हि तिची चूक नाही, कारण तिला मीच कधी वेळ दिला नाही म्हणून तिचा वेळ घालवण्यासाठी तिने मैत्रिणी बनवल्या, आत्ता तिला तरी कोणत्या तोंडाने बोलू कि माझा साठी घरी बस म्हणून?? एक मुलगा होता, त्याला माझा मुळेच दूर जावे लागले, त्याला पण काही बोलू शकत नाही…. सगळे स्वताचा हाताने गमावले. नाती बांधून ठेवणे आणि शेवट पर्यंत जपणे हि पण एक कला असते असे बोलतात, पण ती माझात नव्हती बहूतेक. माझा रागामुळे मी सगळे गमावले.

आता मनात नको नको ते विचार येतात, कारण आता डोक्याला पण काही काम नाही. आता जगायची इच्छा पण उरली नाही. कधी एकदा हे डोळे बंद करतो असे झाले आहे, पण ते पण माझा हातात नाही म्हणून हात, डोळे नीट आहेत तो पर्यंत थोडे लिहून-वाचून घेतो, परत एवढे सुंदर आयुष्य जगायला मिळेल का माहित नाही. हे आयुष किती सुंदर होते आणि अजून असू शकले असते, फक्त माझा रागामुळे जरा जास्तच खराब झाले, ते पण फक्त माझे नाही तर सगळ्यांचे, हे आता कळते. पण बोलतात ना मानवी स्वभावाला औषध नाही, पण प्रत्येक गोष्टीची वेळ असते म्हणतात, जे जेव्हा व्हायचे आणि जसे व्हायचे तसेच होते, फक्त चांगले राहणे आणि शांत राहणे आपल्या हातात असते. आज सगळ्यांची खूप आठवण येते, पण कोणाला मी आठवत असेन का माहित नाही. कारण तसे मी कधी राहिलोच नाही. आज सगळी नाती आपलीशी वाटतात पण मी एकटा आहे सांगू तरी कोणाला आणि कोणत्या तोंडाने???

जायच्या आधी तुम्हा सगळ्यांना एकच सांगतो, कि नाती खूप छान असतात, त्याला जपा, मोठ्याची भांडणात लहानांना दूर करू नका, त्यांचे मन खूप दुखावते कारण ते खूप कोवळे असते. आणि राग लगेच विसरून जा आणि परत एक व्हा नक्की नाहीतर माझासारखी वेळ येईल शेवटी. देव करो अशी वेळ माझा दुष्मनावर सुद्धा नको येऊदे. आणि आयुष्य हे खूप खूप सुंदर आहे, आणि हे एकदाच जगणार आहात तुम्ही, तर आनंदाने जागा, कोणाला दुखवू नका, सगळ्या हौशी पूर्ण करण्याचा प्रयत्न करा आणि जोडीदाराला मात्र न विसरता वेळ द्या…. कारण कोणी पण जवळ नसले तरी फक्त आपला जोडीदाराच आपल्या सोबत असेल शेवट पर्यंत हे कधीच विसरू नका.

Advertisements
This entry was posted in Uncategorized. Bookmark the permalink.

2 Responses to मानवी स्वभाव

  1. Jayesh Nikwade says:

    khup chan lekh aahe. pratyek vyaktchya aayushyat ase ksan yet asavet bahuda.

  2. aapan lihilela lekh chan aahe. it is real fact….

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s