शेवटी जिंकलो एकदाचे………..

आज ०२ एप्रिल २०११…. आज आपला श्रीलंकेविरुद्ध अंतिम सामना आहे….२ दिवस झाले, कोणते पण न्यूज चायनल लावले कि सगळे कडे एकच विषय, सचिन १००वे शतक आपल्या होम ग्राउंड मध्ये पूर्ण करणार… आपण हा कप जिंकलाच पाहिजे… जास्त आनंद यामुळे होता कि हि म्याच आपल्या मुंबई मध्ये वानखेडे स्टेडियमवर होती, आणि मुंबई मध्ये आपण शेरच आहोत… आपल्या देशात आपण शेरच असणार… मलापण पूर्ण म्याच बघायची आहे म्हणून मी कालच माझा नवऱ्याला आणि सासूला सांगितले कि मी संध्याकाळी काही काम करणार नाही, जेवण सकाळीच जास्त बनवेन नाहीतर संध्याकाळी बाहेरून मागवू. ते दोघे पण काहीच बोलले नाही कारण माझेवढीच त्यांना पण उत्सुकता होती आणि त्यांनी मला समजून घेतले. म्याचसाठी मी सकाळी लवकर उठून सगळे काम आवरून घेतले आणि शेवटी म्याचसाठी फ्री झाली. आज सचिन कढून खूप अपेक्षा आहेत कि तो म्याच जिंकवून देईल, हि अपेक्षा फक्त माझी नाही तर करोडो लोकांची आहे. मी काम आवरून म्याच बघायला आली आणि नेहेमीप्रमाणे आपण नाणेफेक हारलो. श्रीलंकेचा कर्णधार कुमार संगकारा याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारत आणि श्रीलंका यांच्यात होत असलेला अंतिम सामना पाहण्यासाठी वानखेडे स्टेडियमवर बॉलीवूडमधील स्टार मंडळींची गर्दी पहायला मिळत आहे. नुतनीकरणानंतर प्रथमच वानखेडे स्टेडियमवर खेळत असलेल्या भारताच्या गोलंदाजांनी सुरवातीला धारदार गोलंदाजी करीत श्रीलंकेच्या फलंदाजांना धावा करण्याची संधी दिली नाही. त्यांची धावगती (रनरेट) ४ चा आसपास होती. त्यामुळे त्यांचे रन २५० चा आसपास होतील असं माझा अंदाज होता. पण ४४ षटकात २११ चा आसपास रन होते त्यांचे, आणि शेवटचा ५ षटकात (पॉवर प्ले) मध्ये त्यांनी कुत्र्यासारखे चोपून ६३ रन बनवले आणि २७५ चे टार्गेट आपल्याला दिले.

भारताने १९८३ मध्ये विश्वकरंडक जिंकला होता…  वेस्ट इंडिजचा पराभव केला होता…कर्णधार कपिल देव यांनी विश्वकरंडक उंचावला होता…या गोष्टी आम्ही फक्त ऐकल्यात, आणि आज अपेक्षा आहे कि यावेळी तो आपण जिंकूच… पण विश्वकरंडक स्पर्धेत कोणता संघ विजयी होणार, याचे चित्र पुढील काही तासांतच स्पष्ट होईल. मराठी माणसाच्या दृष्टीने क्रिकेट हा खेळण्याबरोबरच चर्चेचा विषय आहे. आता सामना सुरू झाल्यानंतर प्रत्येकजण स्वतःच्या मित्रपरिवार, नातेवाईंकामध्ये त्याबद्दल चर्चा करायला सुरवात करेल. आता भारताचे फलंदाज श्रीलंकेची गोलंदाजी फोडून काढणार का, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. आपण जिंकलोच तर त्यांना जमिनीवर ठेवणार नाहीत, पण हरलोच तर नको तसल्या शिव्या देऊन इज्जत काढतील.


या टार्गेटसमोर भारताच्या डावाची सुरवात खराब झाली. वीरेंद्र सेहवाग पहिल्याच षटकात मलिंगाच्या गोलंदाजीवर आउट झाला (० रन वर १ विकेट). सचिन तेंडुलकरला पण त्यानेच  आउट केले. तेव्हा तर मला उठून त्या मलिंगाचे केस उपटून काढावेसे वाटत होते. यामुळे आपल्या टीमला आणि आम्हाला पण सुरवातीलाच मोठे धक्के बसले. मी तर टीव्ही बघतच नव्हती किती वेळ, कारण खूप खराब हालत वाटत होती आपली. फक्त ऐकत होती, त्यानंतर गौतम गंभीर आणि विराट कोहलीने डाव संभाळत गंभीरने ५० पूर्ण केले. आत्ता गंभीर कडून अपेक्षा आहे कि तो शतक करेल. पण लगेच त्या झिपऱ्या मलिंगाने परत विराट कोहली ला आउट केले. आणि त्यानंतर आपले कर्णधार आले.  नंतर ११३ बॉल मध्ये १११  रन पाहिजे होते…… हे बघून तरी असे वाटत आहे कि आज आपण म्याच जिंकूच. धोनी आजकाल फॉर्म मध्ये नाही म्हणून असे वाटत होते कि धोणीपेक्षा युवी आला असता तर जास्त बरे झाले असते, पण आज धोनीने गरज असताना कर्णधार पदाची लाज राखली. गंभीर चे ९७ रन झाले होते, असे वाटत होते आज हा शतक करणार…. पण तेवड्यात परेराने त्याला बाद केले. ३ रन साठी गंभीर चे शतक हुकले, पण आज गंभीरने सचिन आणि सेहवाग ची कमी पूर्ण केली. ते दोघे गेल्यावर जिंकू असे वाटत नव्हते… कारण २७५ जास्त वाटत होते, पण गंभीर मुळे म्याच बघावीशी वाटत होती, गंभीर गेल्यावर युवी आलाच आणि धोनी ने आणि युवी ने खूप चोपले, १ पण बॉल वाया जाऊ दिला नाही. पण शेवटच्या ५ षटक म्हणजे पॉवर प्ले,जे आपल्या साठी चांगले नाही म्हणून खूप टेन्शन आले होते. पण आज आपल्या पट्ट्यांनी पॉवर प्ले मध्ये आपली पॉवर दाखवली. आणि ११ बॉल मध्ये ५ रन बाकी असताना आपले कर्णधाराने जोरदार छक्का मारून आपल्याला जिंकवले. हातातून जातोय असं वाटणारा सामना परत ताब्यात घेतला. आपल्या खेळाडूंना हक्काचा विजय मिळाला. मुंबई – टीम इंडियाने विश्‍वविजेतेपद जिंकून क्रिकेटचे जग जिंकले! आजच्या यशाचा शिल्पकार ठरला कर्णधार धोनी.

श्रीलंकेला हारवून भारताने शनिवारी विश्‍वकरंडक मिळवला आणि मुंबईत सुरू झाला जल्लोष. एका क्षणी हातातून गेलेला सामना गौतम गंभीर, महेंद्रसिंह धोनी यांनी फिरवला आणि शहरात जणू दिवाळीच साजरी झाली. रस्तोरस्ती, गल्लोगल्ली, घरोघरी केवळ दिवाळीच सुरू झाली. आम्ही काकांना फोन केला तेव्हा ते बोलले कि इथे तर (मुंबई मध्ये) दिवाळी चालू आहे….. सगळीकडे नुसते फटाके फोडत आहेत, गुलाल उधळत आहेत, आणि सगळे नुसता जल्लोष आणि धुमाकूळ घालत आहेत. आज करोडो लोक मुंबईत, सुरतमध्ये, पुण्यात, नाशिकमध्ये धुमाकूळ घालत आहेत….. आणि या सगळ्यांचे आशीर्वाद भारतीय टीम सोबत नेहेमीच असतील, यात काही शंकाच नाही.

आजपर्यंत आपण विश्वकरंडक जिंकलो हे फक्त ऐकले होते, कारण तेव्हा माझा जन्म पण झाला नव्हता…. पण आज प्रत्यक्ष डोळ्यांनी पहिले. डोळे पाणावले, मी तर खूप खूप उत्साही होती.  खुप आनंद झाला. मी तर खूप नाचली. आनंद गगनात मावत नव्हता. असे वाटत होते कोणाला फोन करू आणि कोणाला नको….. पण मी सगळ्यांना मेसेज केले, कारण मी भारतात नाही आज आणि यासाठी सगळ्यांना फोन करणे शक्य नाही…… मेसेज करून १२ तास झाले अजून एकाचे पण प्रतिउत्तर नाही आले आणि याचे मला दुखः आहे…. सगळे जण मला बोलत होते कि लग्नानंतर मी सगळ्यांना विसरणार…. पण आज बहूतेक सगळे मला विसरायला लागलेत. जाऊदेत हा माझा वैयक्तिक प्रश्न आहे… शेवटी सगळ्या भारतीयांना आणि भाटीया टीम ला माझाकडून आणि माझा परिवाराकडून हार्दिक शुभेच्चा. आत्ता सगळे भारतीय ४ तारखेला आनंदाने गुडी उभारतील.

शेवटी दिया ना घुमाके……???????? बिचारा तो शंकर महादेवन किती ओरडून सांगत होता, दे घुमाके… ते पण १ वेळा नाही तर ४-४ वेळा…….. बरे झाले जिंकलो ते, आज त्या शंकर महादेवनला पण बरे वाटले असेल, मी एवढे जीव तोडून गायलो त्याचा काहीतरी उपयोग झाला. तसे मी विचार करत होते कि, आज पर्यंत १९८३ नंतर 1 वेळा  अंतिम सामन्यात येऊन आपली टीम हारली, मध्ये मध्ये तर अंतिम सामन्यात पण येत नव्हती…… आणि यावेळी अचानक कसे जिंकलो??????? मग मला आठवले कदाचित आमचे लग्न भारतीय संघासाठी लकी ठरले असेल….. नाही का? तुम्हाला काय वाटते……..??????

Advertisements
This entry was posted in Uncategorized. Bookmark the permalink.

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s